मुंबई

Mumbai News : वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने चालकाचे ‘झाडावर चढून’ अनोखे आंदोलन!

विधान भवनाबाहेर दोन तास गोंधळ; नशेत असलेल्या चालकास वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी खाली उतरवले

मुंबई :- वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याच्या कथित रागातून एका टॅक्सी चालकाने थेट विधान भवनाच्या बाहेरील एका झाडावर चढून तब्बल दोन तास अनोखे आंदोलन केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. ‘वाहतूक पोलिसांनी दंड केल्याने मी जीव देण्यासाठी झाडावर चढलो’ असे हा चालक ओरडत होता.

नेमके काय घडले?

वेळ आणि ठिकाण: शनिवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास विधान भवनाबाहेर हा गोंधळ सुरू झाला.

जीवे मारण्याची धमकी: संपत चोरमले (वय 32, रा. डोंगरी) नावाचा हा इसम झाडावर चढून ‘मी वरून उडी मारून जीव देईन’ असे वारंवार सांगत होता. त्यामुळे बघ्यांची मोठी गर्दी जमली.

पोलीस आणि अग्निशमन दल: घटनेची माहिती मिळताच स्थानिक कफ परेड पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी त्याला खाली येण्याची विनवणी केली, मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.

पेचप्रसंग: पोलीस किंवा अग्निशमन दलाचे जवान झाडावर चढू लागताच तो उडी मारण्याची धमकी देत होता, ज्यामुळे पेच निर्माण झाला होता.

वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी सोडवला पेच

पोलीस कर्मचारी समजावून दमदाटी करून थकल्यावर, अखेर कफ परेड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी चातुर्याने आणि प्रेमाने परिस्थिती हाताळण्याचा निर्णय घेतला.गायकवाड स्वतः झाडावर चढले आणि त्याच्याशी प्रेमाने बोलू लागले.’तुझी अडचण दूर करू, तुझी मागणी पूर्ण करू’ असे सांगून त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला.संपत चोरमले हा ‘माझ्यावर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली, मराठी माणसांना स्टॉल्स लावू देत नाहीत’ अशी वायफळ बडबड करत होता.गायकवाड यांनी चातुर्याने समजूत घालून त्याला खाली आणले. सकाळी 10 ते दुपारी 12 दरम्यान हे नाट्य सुरू होते.

चालक नशेत असल्याची माहिती

संपत चोरमले हा खासगी ॲप आधारित टॅक्सी चालक असून, तो नशेत होता, त्यामुळे काहीही बडबडत होता, असे पोलिसांनी सांगितले.

वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण यांनी स्पष्ट केले की, आंदोलन करणारा संपत विक्षिप्त असून तो पदपथावर राहतो. त्याच्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई करण्यात आली नव्हती. पोलिसांनी टॅक्सी मालकाला बोलावले असून अधिक चौकशी करण्यात येत आहे. त्याची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाई केली जाईल, असे कफ परेड पोलिसांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0