पुणे
Trending

Ravindra Dhangekar : पुण्यात शिंदे गटाचे रवींद्र धंगेकर ‘आर-पार’च्या पवित्र्यात!

Pune Ravindra Dhangekar: ‘X’ अकाऊंटवरून शिवसेनेचा फोटो हटवला, ‘सत्यमेव जयते’ आणि ‘पुणेकर फर्स्ट’ झळकावले; महायुतीत मोठी खळबळ

पुणे :- पुण्यातील भाजप नेत्यांविरोधात सातत्याने रान उठवणारे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर Ravindra Dhangekar यांनी आता एक मोठे आणि खळबळजनक पाऊल उचलले आहे. त्यांनी त्यांच्या ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंटच्या कव्हर पेजवरून शिवसेनेचा फोटो हटवून त्याऐवजी ‘सत्यमेव जयते’ चा फोटो लावला आहे. या नवीन भूमिकेमुळे ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहणार की पक्षाला सोडचिठ्ठी देणार, अशा जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.

‘पुणेकर फर्स्ट’चा नारा

धंगेकर यांच्या X अकाऊंटच्या कव्हर पेजवर काळ्या रंगात ‘सत्यमेव जयते’ लिहिले असून त्याखाली ‘पुणेकर फर्स्ट’ असे नमूद करण्यात आले आहे. यामुळे धंगेकर आता आर-पारच्या पवित्र्यात असल्याचे स्पष्ट होत आहे.

भाजप नेत्यांवर थेट निशाणा

गेल्या काही दिवसांपासून रवींद्र धंगेकर हे महायुतीतील त्यांचे सहकारी पक्ष भाजपचे नेते, मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना लक्ष्य करत आहेत. निलेश घायवळ तसेच जैन बोर्डिंग हाऊस जमिनीच्या वादातून त्यांनी या दोन्ही भाजप नेत्यांना टार्गेट केले आहे.

धंगेकर यांनी यापूर्वी “मी भाजप विरोधात नाही, तर विकृती विरोधात बोललो आहे,” असे म्हटले होते. “नोटीस देतील किंवा हकालपट्टी करतील असं वाटत नाही,” असे मतही त्यांनी व्यक्त केले होते.

पक्षांतराची चर्चा

धंगेकर यांची ही भूमिका महायुतीला अडचणीत आणणारी ठरत असल्याने पुण्यातील भाजप नेत्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यांची तक्रार केली होती. शिंदे गट धंगेकर यांच्यावर कारवाई करण्याची शक्यता असतानाच, त्याआधीच धंगेकर यांनी ‘X’ अकाऊंटवर बदल करून भविष्यातील आपल्या निर्णयाचे संकेत दिले आहेत.

धंगेकर यांनी स्पष्ट केले आहे, “मी पुणेकर पहिल्यांदा आहे. पुणेकर म्हणून मी लढतोय. कुठलीही राजकीय किंमत चुकवायला तयार आहे. मात्र, या प्रकरणात मी शांत बसणार नाही. या प्रकरणात सर्वांवर गुन्हा दाखल होत नाही, तो पर्यंत थांबणार नाही.” त्यांच्या या भूमिकेमुळे महायुतीच्या नेत्यांची कोंडी झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0