Thane Crime Branch : नाशिक-मुंबई हायवेवर दरोड्याच्या तयारीत असलेले झारखंडी नक्षलवादी आणि 5 आरोपी पिस्तुलासह जेरबंद

Thane Crime Branch Arrested Robbers : आरोपींकडून 3 अग्नीशस्त्रे, 4 जिवंत काडतुसे, कोयता, कटावणी आणि मिरची पूड जप्त
ठाणे :- नाशिक-मुंबई हायवेवर प्रवास करणाऱ्या वाहनांना अडवून मोठा आणि प्राणघातक दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या झारखंड राज्यातील नक्षलवादी गट आणि अन्य 5 आरोपींना ठाणे पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून शस्त्रसाठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे ठाणे पोलिसांनी मोठा दरोडा होण्यापूर्वीच उधळून लावला आहे. Thane Police Latest News
दरोड्याचा भयानक कट
मालमत्ता गुन्हे कक्षातील पोलीस हवालदार संदीप भागरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, पोलीस पथकाने दिनांक 14 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 6.35 वाजता खारेगाव टोलनाक्याकडून कळवा बाजूकडे जाणाऱ्या रोडवर सापळा रचला.
झारखंडमधून आलेले हे आरोपी बोलेरो मोटार कार (क्र. JH-01-CX-4728) मधून नाशिक-मुंबई हायवेवर Mumbai Nashik Highway Criminal प्रवास करणाऱ्या वाहनांना धाक दाखवून दरोडा टाकण्याच्या तयारीत होते. त्यांची योजना होती की, प्रवाशांना पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांच्याकडील मौल्यवान ऐवज चोरी करायचा. Thane Police News
पोलिसांनी सापळा रचून झारखंडमधील नक्षलवादी असलेल्या मुख्य आरोपींसह एकूण 6 जणांना ताब्यात घेतले. अटकेतील आरोपींमध्ये राजेंद्र महेश यादव, मोहम्मद सरफराज अब्दुल सत्तार अन्सारी, अब्दुल रहीम सलीम अन्सारी, सद्दाम अबुल अन्सारी आणि शिवकुमार चौठा उराव (सर्व झारखंड) तसेच अरविंद बाबूराम यादव (उत्तर प्रदेश) यांचा समावेश आहे. Thane Latest Crime News
आरोपींकडून खालील 7 लाख 96 हजार 900 रुपये किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला:
03 अग्नीशस्त्रे (पिस्तूल)
04 जिवंत काडतुसे
दरोड्यासाठी लागणारे साहित्य: लोखंडी कोयता, लोखंडी कटावणी, मिरची पूड आणि रस्सी
बोलेरो मोटार कार (क्र. JH-01-CX-4728) आणि 8 मोबाईल फोन
गुन्हा दाखल
या आरोपींविरुद्ध कळवा पोलीस ठाणे Kalwa Police News येथे अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 चे कलम 310(4), (6) (दरोडा टाकण्याचा प्रयत्न) सह शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. पंजाबराव उगले आणि पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे कक्षाच्या पथकाने ही अत्यंत महत्त्वाची आणि मोलाची कामगिरी पार पाडली.


