मुंबई

Mira Bhayandar Cyber Police News : सायबर जनजागृती! भाईंदर डॉक्टर्स असोसिएशनसाठी सायबर पोलिसांचे ‘ऑनलाईन वेबीनार’; 150 डॉक्टरांना धोके आणि उपायांवर मार्गदर्शन

•राष्ट्रीय सायबर सुरक्षा महिन्याच्या निमित्ताने मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाकडून विशेष आयोजन

मिरा भाईंदर/वसई विरार :- ऑक्टोबर महिना ‘राष्ट्रीय सायबर सुरक्षा महिना’ म्हणून साजरा होत असताना, मिरा भाईंदर वसई विरार (एमबीव्हीव्ही) पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सायबर सुरक्षेबाबत जनजागृती मोहीम तीव्र करण्यात आली आहे. याच अनुषंगाने, सायबर पोलीस ठाण्याने भाईंदर डॉक्टर्स असोसिएशनच्या सहकार्याने डॉक्टर्स आणि वैद्यकीय सेवा देणाऱ्या स्टाफसाठी एका विशेष ऑनलाइन वेबीनारचे आयोजन केले होते.

काल (15 ऑक्टोबर 2025) रोजी दुपारी 3.00 ते 4.30 या वेळेत झालेल्या या वेबीनारमध्ये एकूण 150 डॉक्टर्स आणि वैद्यकीय स्टाफने सक्रिय सहभाग नोंदवला.

वेबीनारमधील प्रमुख मार्गदर्शन

सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर यांनी या सत्रात वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित संभाव्य सायबर धोके आणि त्यावरील उपाययोजनांवर सविस्तर माहिती दिली. त्यांनी मार्गदर्शन केलेल्या प्रमुख विषयांमध्ये खालील बाबींचा समावेश होता:

1.सध्या स्थितीत घडणारे वेगवेगळे सायबर गुन्हे (Trending Cyber Crimes).

2.सोशल मीडिया संदर्भात घडणारे गुन्हे आणि योग्य आचारसंहिता (Social Media Related crimes/etiquette).

3.ऑनलाईन सायबर गुन्ह्यांना कसे टाळावे (Precautions to be Taken).

4.ऑनलाईन गुन्ह्यास बळी पडल्यास तात्काळ तक्रार कुठे व कशी नोंदवावी (Cyber Help Line Number 1930/1945).

या सत्रात उपस्थितांनी सायबर विषयक माहिती जाणून घेण्यासाठी विविध प्रश्न आणि शंका विचारल्या, ज्यांचे समाधानकारक उत्तर पोलिसांकडून देण्यात आले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात भाईंदर डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. चिराग शाह, सचिव डॉ. संजय सुराना, तसेच डॉ. राजेश पालांडे आणि डॉ. गणेश राठोड यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. उपस्थितांनी या उपयुक्त माहितीबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या.

डॉ. चिराग शाह यांनी सायबर विषयक उपयुक्त माहिती व मार्गदर्शनाबद्दल मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0