Nalasopra Crime News : सराईत मोबाईल चोराला नालासोपाऱ्यातून अटक; 1.16 लाखांचे 20 फोन हस्तगत

Kashigaon Police Latest News : काशिगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई ; घरफोडीच्या गुन्ह्यात झाली अटक मिरारोड, नवघरसह अनेक पोलीस ठाण्यात आरोपीवर गुन्हे दाखल
मिरारोड :- मिरारोड परिसरातील एका घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना, काशिगाव पोलीस ठाण्याच्या kashigaon Police Station गुन्हे प्रकटीकरण शाखेने एका सराईत मोबाईल चोराला अटक करून त्याच्याकडून विविध कंपन्यांचे 20 मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. जप्त केलेल्या या मोबाईलची किंमत सुमारे 1 लाख 16 हजार रुपये आहे. Mira Road Latest Crime News
काय आहे नेमके प्रकरण?
दिनांक 9 ऑक्टोबर 2025 रोजी मिरारोड येथील हाफीजुल रेहमान शेख यांच्या राहत्या घरात रात्रीच्या वेळी खिडकीवाटे प्रवेश करून घरफोडी झाली होती. आरोपीने घरातील 30 हजार रुपये किंमतीचे मोबाईल आणि रोख रक्कम चोरली होती. याप्रकरणी काशिगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी उघड केला छडा
या गुन्ह्याचा तपास करत असताना काशिगाव पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी आणि अंमलदार यांनी कौशल्यपूर्ण तपास करून आरोपी अब्दुल रेहमान ताहीर बडु (वय 28, रा. नालासोपारा पूर्व) याला ताब्यात घेतले.
चौकशी दरम्यान त्याने काशिगाव येथील घरफोडीच्या गुन्ह्यातील मोबाईलसह त्याने मिरारोड, नवघर आणि इतर ठिकाणी चोरी केलेले सॅमसंग, ओप्पो, विवो आणि आयफोन अशा विविध कंपन्यांचे एकूण 20 मोबाईल फोन चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून सर्व चोरीचा मुद्देमाल जप्त केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
अभिलेख तपासले असता, आरोपी अब्दुल रेहमान बडु याच्याविरोधात यापूर्वी काशिगाव, पेल्हार, मांडवी आणि मिरारोड पोलीस ठाण्यांतही विविध गुन्हे दाखल आहेत.
पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गणपत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली काशिगाव पोलिसांनी ही यशस्वी कामगिरी पार पाडली आहे.


