मुंबईठाणे
Trending

कथित सिडको 5000 कोटी जमीन घोटाळा: मंत्री संजय शिरसाट अडचणीत;लोकायुक्तांकडून अहवाल मागवला

Rohit Pawar On Sanjay Shirsat : मराठा साम्राज्याविरोधात ब्रिटिशांना मदत करणाऱ्या कुटुंबाला 16 एकर जमीन दिल्याची तक्रार ; सरकार अजून किती दिवस पांघरूण घालणार? – आमदार रोहित पवारांचा संतप्त सवाल

मुंबई :- सिडकोचे माजी अध्यक्ष आणि शिंदे गटाचे नेते, मंत्री संजय शिरसाट Sanjay Shirsat यांनी नवी मुंबईत मराठा साम्राज्याच्या विरोधात ब्रिटिशांना मदत करणाऱ्या बिवलकर कुटुंबाला 16 एकर जमीन दिल्याचा आरोप आता गंभीर वळणावर पोहोचला आहे. आमदार रोहित पवार Rohit Pawar यांनी केलेल्या या 5,000 कोटी रुपयांच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी आता सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट लोकायुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे.

लोकायुक्तांकडून अहवाल मागवला

या प्रकरणाच्या ताज्या घडामोडीची माहिती रोहित पवार यांनी ट्विटद्वारे दिली. ते म्हणाले, “सिडकोची 5,000 कोटींची जमीन बिवलकर यांच्या घशात घातल्याच्या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्यांनी लोकायुक्तांकडे तक्रार केली आहे. या तक्रारीची दखल घेत लोकायुक्तांनी नगरविकास विभागाचे सचिव, महसूल विभागाचे सचिव, सिडकोचे एमडी आणि रायगड विभागाचे उप वनसंरक्षक यांच्याकडून अहवाल मागवला असल्याचे समजत आहे.”

रोहित पवारांचा सरकारला सवाल

या निमित्ताने रोहित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी मंत्री संजय शिरसाट यांच्यावर टीका करताना म्हटले:

“मंत्री संजय शिरसाट यांनी केलेल्या या महापराक्रमी घोटाळ्याची चौकशी लोकायुक्त करत आहेत, स्वतः माननीय सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी सरकारला फटकारले आहे. पण तरीसुद्धा झोपलेल्या सरकारला जाग येत नाहीये. अजून किती दिवस पांघरून घालणार? सरकारने कितीही पांघरूण घातले तरी आम्ही शिरसाट यांचा पर्दाफाश करून स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळवून देऊच,” असे आश्वासन त्यांनी दिले.

नेमका आरोप काय आहे?

रोहित पवार यांनी दोन महिन्यांपूर्वी असा आरोप केला होता की, मराठा साम्राज्याविरोधात मदत केल्याबद्दल ब्रिटिशांनी बिवलकर कुटुंबाला सुमारे 4 हजार एकर जमीन दिली होती. नंतर ही जमीन सरकारजमा झाली.

संजय शिरसाट यांनी 19 सप्टेंबर 2024 रोजी सिडकोचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच पहिल्याच बैठकीत बिवलकर कुटुंबाला नियमांना डावलून 61,000 चौ.मी. (सुमारे 16 एकर) जमीन देण्याचा निर्णय घेतला. या जमिनीची बाजारातील किंमत 5,000 कोटी रुपये आहे. त्यामुळे शिरसाट यांनी पदाचा गैरवापर करून हा मोठा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला होता. आता लोकायुक्तांच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0