
Thane Water Cut Latest News : पिसे आणि टेमघर जलशुद्धीकरण केंद्रातील दुरुस्तीमुळे पाणी बंद ; घोडबंदर रोड, वर्तकनगरसह कळवा शहराला फटका; पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणी मिळण्याची शक्यता
ठाणे :- ठाणे महानगरपालिकेच्या TMC स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतील महत्त्वाच्या कामांसाठी बुधवारी (15 ऑक्टोबर) शहराच्या काही भागातील पाणीपुरवठा 12 तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पिसे आणि टेमघर जलशुद्धीकरण केंद्रातील यंत्रणांच्या दुरुस्तीसाठी हा शटडाऊन घेण्यात येणार असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. Thane Water Cut News
या भागांत पाणीपुरवठा राहणार बंद
बुधवारी सकाळी 9 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील. याचा परिणाम खालील भागांतील नागरिकांवर होणार आहे:
घोडबंदर रोड
वर्तकनगर
ऋतुपार्क
कारागृह परिसर
गांधीनगर
रुस्तमजी
सिद्धांचल
समतानगर
सिद्धेश्वर
इटर्निटी
जॉन्सन
कळवा शहरातील काही भाग
या शटडाऊनच्या काळात मे. स्टेम प्राधिकरणाचा पाणीपुरवठा मात्र झोनिंग करून टप्प्याटप्प्याने सुरू ठेवण्यात येणार आहे.
दुरुस्तीची कामे
जलशुद्धीकरण केंद्रांमधील उच्चदाब सबस्टेशनमधील आवश्यक कामे, कंट्रोल पॅनलची दुरुस्ती आणि ट्रान्सफॉर्मर ऑईल फिल्ट्रेशनची कामे यावेळी केली जाणार आहेत. Thane Water Supply Cut News
पाणीपुरवठा बंदनंतर पुढील एक ते दोन दिवस या भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आणि सहकार्य करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.


