क्राईम न्यूजठाणेमुंबई

Mankhurd Wanted Criminal : मानखुर्दचा सराईत गुंड ‘सुहेल खान’ अखेर स्थानबद्ध

Mumbai Wanted Criminal Arrested : खुनाचा प्रयत्न, खंडणी आणि दहशत माजवणाऱ्या आरोपीविरुद्ध MPDA कायद्यान्वये कारवाई ; ट्रॉम्बे, पवई, मुलुंड पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल; सार्वजनिक सुव्यवस्थेसाठी कठोर पाऊल

मुंबई :- ट्रॉम्बे पोलीस ठाणे Trombay Police News आणि लगतच्या परिसरात दहशत निर्माण करून सार्वजनिक शांतता धोक्यात आणणाऱ्या सराईत गुंड सुहेल उर्फ सोहेल मुश्ताक खान (वय 21, रा. मानखुर्द) याच्यावर अखेर महाराष्ट्र झोपडप‌ट्टी गुंड, हातभट्टीवाले… (MPDA) कायदा, 1981 अन्वये स्थानबद्धतेची (Detention) कारवाई करण्यात आली आहे. Mumbai Wanted Criminal Arrested

काय आहेत गुन्हे?

सुहेल खान याच्याविरोधात ट्रॉम्बे, पवई आणि मुलुंड पोलीस ठाण्यांमध्ये खुनाचा प्रयत्न करणे, प्राणघातक हत्यारे बाळगून मारामारी करणे, जबरी चोरी करणे आणि खंडणी मागणे असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. सन 2024 पासून त्याच्यावर गुन्हे नोंद आहेत. वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्याच्या वर्तणुकीत सुधारणा झाली नव्हती, ज्यामुळे तो सार्वजनिक शांतता आणि सुरक्षिततेसाठी धोकादायक व्यक्ती बनला होता.

MPDA कायद्यान्वये कारवाई

ट्रॉम्बे पोलीस ठाण्याच्या Trombay Police Station वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी सुहेल खानच्या गुन्हेगारी कृत्यांचा सखोल अहवाल पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-6 यांच्यामार्फत बृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त यांच्याकडे सादर केला होता.

पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांनी या प्रस्तावाला मंजुरी देत दिनांक 10 ऑक्टोबर 2025 रोजी सुहेल खान याला स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, आज (11 ऑक्टोबर) त्याला ठाणे मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
परिमंडळ-6 अंतर्गत या वर्षातील MPDA कायद्यान्वये केलेली ही दुसरी कारवाई आहे. या कठोर कारवाईमुळे सार्वजनिक सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या कोणत्याही गुन्हेगाराची गय केली जाणार नाही, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0