Bihar Election : बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर! दोन टप्प्यांत मतदान, 14 नोव्हेंबरला निकाल

Bihar Election Latest News : केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला निर्णय; 6 नोव्हेंबर आणि 11 नोव्हेंबर रोजी मतदान, ज्ञानेश कुमार यांची माहिती.
ANI :- संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकांच्या Bihar Election Latest News तारखा केंद्रीय निवडणूक आयोगाने आज जाहीर केल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रमुख ज्ञानेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. बिहारमधील मतदान प्रक्रिया दोन टप्प्यांत पार पडणार आहे.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार
पहिला टप्पा:
मतदान: 6 नोव्हेंबर
अधिसूचना: 10 ऑक्टोबर
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 17 ऑक्टोबर
अर्ज मागे घेण्याची मुदत: 20 ऑक्टोबर
दुसरा टप्पा
मतदान: 11 नोव्हेंबर
अधिसूचना: 13 ऑक्टोबर
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 20 ऑक्टोबर
अर्ज मागे घेण्याची मुदत: 23 ऑक्टोबर
या निवडणुकांचा निकाल 14 नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
निष्पक्षतेवर भर आणि ‘झिरो टॉलरन्स’
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी माहिती दिली की, बिहारमधील सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांशी, जिल्हाधिकाऱ्यांशी आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. “मतदानाच्या 10 दिवस आधीपर्यंत मतदारांना नावे नोंदवता येतील,” असे ते म्हणाले.
यावेळी निवडणूक आयोगाने फेक न्यूजवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. निवडणुकीच्या काळात हिंसाचारावर ‘शून्य सहनशीलतेचे’ (Zero Tolerance) निर्देश देण्यात आले असून, सर्व अधिकारी निष्पक्षपणे काम करतील. तसेच, वृद्ध मतदारांसाठी रॅम्प आणि व्हीलचेअर उपलब्ध असतील, तर सर्व मतदान केंद्रांवरील प्रक्रिया थेट प्रक्षेपित केली जाईल, अशी माहिती आयोगाने दिली आहे.



