क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Mumbai Breaking News : राजमात माशी! ‘गोइला बटर चिकन’चा घाणेरडा तमाशा — मुंबईकरांचा संताप उसळला!

महाराष्ट्र मिरर
विवेक राजेंद्र जगताप
मुंबई (विरा देसाई रोड):
“राजमा मागितलं… आणि मिळाली माशी!”
विरा देसाई रोडवरील नामांकित ‘गोइला बटर चिकन’ Goila Butter Chicken Hotel या हॉटेलचा स्वच्छतेचा बुरखा फाटला आहे. ग्राहकाच्या थाळीत माशी नाचताना दिसल्याने मुंबईकरांच्या तोंडात संतापाचा अंगार पेटला आहे! Mumbai Breaking News

महागड्या जेवणाचे बिल आणि त्यात माशीचं ‘टॉपिंग’ — असा घाणेरडा प्रकार उघडकीस आल्यानंतर हॉटेल व्यवस्थापनाचे हातपाय गळाले. ग्राहकाने संतप्त होऊन व्यवस्थापनाला जाब विचारला, पण त्यांचं उत्तर तितकंच बेस्वाद आणि उडवाउडवीचं होतं.

दरम्यान, स्थानिक अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांना या प्रकाराची अद्याप माहितीच नाही, हे अधिक धक्कादायक आहे. नागरिक प्रश्न विचारत आहेत —

“महागड्या हॉटेलात माशी मिळाली तरी कारवाई कुठे आहे? स्वच्छ भारत फक्त जाहिरातींमध्येच का?”

या घटनेवरून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 273 लागू होऊ शकते — म्हणजेच मानवी उपभोगासाठी अयोग्य अन्न देणे हा गुन्हा ठरतो. दोषी आढळल्यास कारावास आणि दंड दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

मुंबईकरांच्या थाळीत माशी उतरली आणि प्रशासन मात्र गप्प — आता लोक विचारतात,

“अन्नात माशी आणि सिस्टिममध्ये निष्क्रियता… ह्यालाच काय म्हणायचं ‘क्लासिक कॉम्बो’?”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0