क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Dadar Bus Accident : दादरमध्ये भीषण अपघात! भरधाव टेम्पोची धडक बसून बेस्ट बस थांब्यावर घुसली; एक पादचारी ठार, एका महिलेसह चार जखमी

Dadar Bus Tempo Accident News : टेम्पोने टॅक्सी आणि खासगी मोटारीलाही धडक दिली; टेम्पो चालक ताब्यात, जखमींवर शीव रुग्णालयात उपचार सुरू

मुंबई :- दादर परिसरातील प्लाझा बस थांब्याजवळ शनिवारी (4 ऑक्टोबर) रात्री उशिरा झालेल्या एका भीषण अपघातात एक पादचारी जागीच ठार झाला, तर एका महिलेसह चार प्रवासी गंभीर जखमी झाले. भरधाव वेगात असलेल्या टेम्पो ट्रॅव्हलरने बेस्ट बसला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला.

रात्री 11.30 वाजता दुर्घटना

बेस्ट उपक्रमातील मातेश्वरी कंपनीची बस (मार्ग क्र. 169) वरळी आगारावरून प्रतीक्षानगर आगाराकडे जात होती. रात्री 11.30 च्या सुमारास ही बस प्लाझा बस थांब्याजवळ येत असताना दादर टीटीकडून शिवाजी पार्कच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या एका टेम्पो ट्रॅव्हलरच्या चालकाचे नियंत्रण सुटले.

या बसच्या पुढील बाजूच्या उजव्या चाकाला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की, बेस्ट बस डावीकडे वळली आणि थांब्यावर उभ्या असलेल्या प्रवाशांना व पादचाऱ्यांना चिरडत पुढे गेली. अपघातात बसचे पुढील चाक तुटले, तर समोरील काचही फुटली.

पादचारी ठार, टॅक्सी-कारचेही नुकसान

बेस्ट बसला धडक दिल्यानंतर टेम्पो ट्रॅव्हलरने रस्त्यावर उभ्या असलेल्या एका टॅक्सीला आणि एका खासगी मोटारीलाही धडक दिली. या अपघातात पादचारी शहाबुद्दीन (वय 37 वय) हे जागीच ठार झाले. त्यांना तातडीने शीव रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

याशिवाय, राहुल पडाले (30 वय), रोहित पडाले (33 वय), अक्षय पडाले (25 वय) आणि महिला प्रवासी विद्या मोते (28 वय) हे चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच शिवाजी पार्क पोलीस, बेस्ट उपक्रमातील अधिकारी आणि इतर अत्यावश्यक पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने शीव रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी टेम्पो ट्रॅव्हलर चालकाला ताब्यात घेतले असून, शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0