मुंबईठाणे

Mumbai News : शिंदे गटाचा दसरा मेळावा यंदा गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये; राज्यभरातील शिवसैनिक पूरग्रस्तांच्या मदतीसाठी बांधावर

Eknath Shinde Nesco Center : जिथे संकट, तिथे शिवसेना’ – यंदाचा मेळावा भव्य न होता फक्त एमएमआर क्षेत्रातील शिवसैनिकांसाठी मर्यादित.

मुंबई :- शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट)Eknath Shinde दसरा मेळाव्याच्या स्थळाबाबत आणि स्वरूपाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा हा मेळावा आझाद मैदानाऐवजी गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, राज्यातील पूरस्थिती आणि शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेता, हा मेळावा केवळ मुंबई आणि एमएमआर (MMR) क्षेत्रातील शिवसैनिकांसाठीच मर्यादित राहणार आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत या निर्णयाची माहिती दिली. यंदाचा दसरा मेळावा भव्य होणार नसून, राज्यातील सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक मेळाव्याला हजर राहणार नाहीत. त्याऐवजी, पूरग्रस्त भागांमध्ये मदतकार्य करण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत.

80 टक्के समाजकारण, 20 टक्के राजकारण

या निर्णयामागील भूमिका स्पष्ट करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, “जिथे आपत्ती, संकट तिथे शिवसेना, हे समीकरण आहे. एकनाथ शिंदे तिथे धावून जातो. आपल्या लोकांना मदत केली पाहिजे ही त्यामागील भावना आहे.” हे खऱ्या अर्थाने 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण आहे.

पूरपरिस्थिती असलेल्या भागातील कार्यकर्त्यांना दसरा मेळाव्यासाठी मुंबईत न बोलावता, त्यांनी आपापल्या यंत्रणांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या घरात जाऊन, बांधावर जाऊन मदत करावी, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. तसेच, या दसरा मेळाव्यात शेतकरी आणि पूरग्रस्तांसाठी निधी संकलित केला जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0