क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Thane Crime News : ‘माझ्या बापाला मारतो का, मी 17 वर्षांचा आहे, कसा पण सुटेल!’; ठाण्यात सूडाच्या भावनेतून अल्पवयीन मुलाचा जीवघेणा हल्ला

Thane Breaking News : पाच वर्षांपूर्वी फलक फाडण्यावरून झालेला वाद थेट हत्येच्या प्रयत्नापर्यंत पोहोचला

ठाणे :- ठाण्यातील कळवा, विटावा परिसरात पाच वर्षांपूर्वी फलक फाडण्यावरून झालेल्या एका क्षुल्लक वादातून सूडाच्या भावनेतून एका अल्पवयीन मुलाने एका 35 वर्षीय व्यक्तीला चाकूने भोसकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ‘मी 17 वर्षांचा आहे, जेलमधून कसा पण सुटेल,’ असे म्हणत या मुलाने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. Thane Latest Crime News

नेमके काय घडले?

कळवा येथील विटावा भागात राहणारे 35 वर्षीय जखमी व्यक्ती पूर्वी मनोरपाडा परिसरात राहत होते. पाच वर्षांपूर्वी त्यांनी गणेशोत्सवादरम्यान उथळसर भागात एक फलक लावला होता, जो अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी फाडला होता. यावरून दोन्ही कुटुंबात तेव्हा वाद झाला होता. Thane Police Latest News

हा वाद शांत झाला असला तरी, अल्पवयीन मुलाच्या मनात सूडाची भावना कायम होती. काही दिवसांपूर्वी, नवरात्रौत्सवासाठी ही 35 वर्षीय व्यक्ती मनोरपाडा परिसरात गेली होती. पहाटे घरी परतत असताना, त्या अल्पवयीन मुलाने त्यांना अडवले आणि वडिलांचा जुना वाद उकरून काढला.

‘तुला मारून जेलमधून कसा पण सुटेल!’

हातात चाकू घेऊन आलेल्या मुलाने, ‘माझ्या बापाला मारतो का’ असे म्हणत त्यांच्यासोबत वाद घातला. त्यानंतर, ‘माझ्या बापाने तुला मारायला सांगितलं आहे. मी 17 वर्षांचा आहे, तुला मारून जेलमधून कसा पण सुटेल’ असे धमकावत त्याने त्या व्यक्तीच्या पाठीवर, मांडीवर, छातीवर आणि पोटाजवळ चाकूने सपासप वार केले आणि त्यांना भोसकले.

जखमी व्यक्तीने कसाबसा त्याच्या तावडीतून पळ काढला. काही अंतर चालल्यानंतर ते बेशुद्ध पडले, त्यानंतर नागरिकांनी त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

याप्रकरणी जखमी व्यक्तीच्या तक्रारीवरून राबोडी पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलगा आणि त्याच्या वडिलांविरोधात हत्येच्या प्रयत्नाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समाजासाठी गंभीर इशारा

ज्या वयात तरुणांच्या हातात पुस्तके आणि लेखणी असायला हवी, त्या वयात त्यांच्या हाती चाकू आणि पिस्तुले येत असतील, तर ही समाजासाठी अत्यंत गंभीर बाब आहे. सूडाच्या भावनेतून अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे वळत आहेत. कुटुंब, समाज आणि शिक्षण व्यवस्था यावर वेळेत नियंत्रण ठेवू शकली नाही, तर ही गुन्हेगारी प्रवृत्ती उद्या आणखी निरपराध बळी घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0