महाराष्ट्र
Trending

Kashmira Police News : ‘दारू पिऊन गाडी चालवणारे खबरदार!’ – काशीमीरा पोलिसांचा धडक ‘ऑपरेशन ऑल आऊट’, दोन महिन्यांत तब्बल 39 चालकांवर कारवाई

Kashmira Police Take Action Against Drink Drive Driver : लेट नाईट आस्थापनांनाही जोरदार दणका; एकाच वेळी 2.50 लाखांहून अधिक दंड वसूल

मीरा-भाईंदर :- ‘ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह’ करणाऱ्या बेजबाबदार चालकांसाठी आणि नियमांचे उल्लंघन करत रात्री उशिरापर्यंत आस्थापना चालू ठेवणाऱ्या मालकांसाठी ही धोक्याची घंटा आहे! काशीमीरा पोलिसांनी गेल्या दोन महिन्यांत (जुलै आणि ऑगस्ट 2025) राबवलेल्या विशेष मोहिमेत तब्बल 39 दारुड्या चालकांवर तडकाफडकी कारवाई केली आहे. Mira Bhayandar Police Latest News

कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच जीवघेण्या अपघातांना आळा घालण्यासाठी हा ‘ऑपरेशन ऑल आऊट’ सुरू करण्यात आला. यासोबतच, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 33 (डब्ल्यू) चे उल्लंघन करणाऱ्या 73 लेट नाईट आस्थापनांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला.

लोकअदालतीमध्ये विक्रमी दंडवसुली

पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे प्रकरण 13 सप्टेंबर 2025 रोजी मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, मीरा-भाईंदर न्यायालयात झालेल्या लोकअदालतीत चालवण्यात आले. यात:

दारु पिऊन वाहन चालवणाऱ्या 39 चालकांकडून 2 लाख 12 हजार 800 इतका भरघोस दंड वसूल करण्यात आला.

लेट नाईट आस्थापना चालवणाऱ्यांकडून 38 हजार 100 दंड आकारण्यात आला.

या दोन प्रकारच्या गुन्हेगारांकडून एकाच वेळी 2 लाख 50 हजार 900 हून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे.

पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून, पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, “दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या चालकांच्या विरोधात यापुढेही सतत मोहीमा राबविण्यात येणार आहेत.”

नागरिकांना थेट इशारा:

वाहतूक नियमांचे पालन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. मद्यपान करून केवळ स्वतःचाच नव्हे, तर इतरांचाही जीव धोक्यात घालू नका!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0