Nalasopra Crime News : ‘चोरट्यांच्या गुहेत’ शिरून पोलिसांनी केली धडाकेबाज कारवाई; सराईत घरफोडी करणारा ‘दिनेश’ अखेर गजाआड

Nalasopra Crime Branch Latest News : कुलूप तोडून टीव्ही, रोख रक्कम लंपास, पण सीसीटीव्ही फुटेजने आरोपीला अडकवले
नालासोपारा :- दिवसाढवळ्या घरफोडी करून पोलिसांना आव्हान देणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला नालासोपारा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हा चोरटा इतका सराईत आहे की, त्याने अनेकांची घरे साफ केली होती. मात्र, पोलिसांनी गुप्त माहिती आणि तपास कौशल्याचा वापर करून त्याला शिताफीने पकडले. Nalasopra Latest Crime News
कसा झाला गुन्हा?
गेल्या काही दिवसांपासून नालासोपाऱ्यात घरफोडीच्या घटना वाढल्या होत्या. नुकतीच विश्वंभर शंकर होरंबे यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने टीव्ही आणि रोख रक्कम चोरून नेली. घराचे कुलूप तोडून चोरट्याने हा गुन्हा केला होता. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. Nalasopra Latest Breaking News
पोलिसांनी कसा पकडला चोर?
गुन्हा दाखल झाल्यानंतर आचोळे पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने तातडीने तपास सुरू केला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि गुप्त बातमीदारांचे जाळे सक्रिय केले. यातूनच पोलिसांना दिनेश उर्फ डुंगाराम सेवाराम पटेल (वय 38) या सराईत गुन्हेगाराची माहिती मिळाली. Nalasopra Police Latest News
पोलिसांचा सुगावा लागल्याने दिनेश पटेल आपले अस्तित्व लपवून फिरत होता. पण पोलीसही त्याच्या मागावर होते. अखेर मध्यरात्री नालासोपारा रेल्वे स्टेशनजवळ पोलिसांनी त्याला संशयास्पद अवस्थेत पाहिले. अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या दिनेशला पोलिसांनी पकडले.
उडवाउडवीची उत्तरे, पण पोलिसांसमोर अखेर कबुली
सुरुवातीला त्याने पळून जाण्याचे कारण विचारले असता उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी त्याला सीसीटीव्ही फुटेज दाखवले आणि खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे .आरोपी दिनेश उर्फ डुंगाराम पटेल हा मूळचा फळविक्रेता असून, तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. या आरोपीच्या अटकेमुळे चोरीला गेलेला सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, त्याने केलेले आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. या यशस्वी कामगिरीबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आचोळे पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कौतुक केले आहे.


