पुणे

Pune Crime News : 7% परताव्याचे आमिष दाखवून 1.92 कोटींची फसवणूक; पुणे पोलिसांकडून एकाला अटक

•लोहगावातील व्यावसायिकाला कोट्यवधींचा गंडा, काही काळ परतावा दिल्यानंतर आरोपी फरार

पुणे :- गुंतवणुकीवर आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाची तब्बल 1 कोटी 92 लाख 95 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

सचिन विलास कांबळे (वय 42, रा. थेरगाव, पिंपरी-चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. लोहगाव येथील एका व्यावसायिकाने या संदर्भात विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी कांबळे आणि फिर्यादी यांची गेल्या वर्षी ओळख झाली होती. कांबळे याने लोहगावात एक खासगी कार्यालय उघडून गुंतवणुकीवर 7 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवले.

कोट्यवधींची गुंतवणूक आणि फसगत

आरोपीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून व्यावसायिकाने सुरुवातीला 33 लाख 80 हजार रुपये गुंतवले. त्यानंतर व्यावसायिक आणि त्याच्या परिचितांनी मिळून एकूण 1 कोटी 92 लाख 95 हजार रुपये कांबळेकडे गुंतवले. सुरुवातीला काही काळ परतावा दिल्यानंतर कांबळेने अचानक परतावा देणे बंद केले. जेव्हा गुंतवणुकदारांनी त्याच्याकडे विचारणा केली, तेव्हा त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यावसायिकांनी पोलिसांत धाव घेतली.विमानतळ पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी कांबळेला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शरद शेळके करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0