ठाणेमुंबई
Trending

Sushma Andhare : गडकरींच्या कुकर्मांची पोलखोल करणार’; सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा थेट इशारा

Sushma Anadhare On Nitin Gadkari : दोन दिवसांपूर्वीच सुषमा अंधारे यांनी केले होते भाकीत, पतीच्या ‘मित्रा’ संस्थेतील नियुक्तीवरही वाद

मुंबई :- सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी Nitin Gadkari यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे. गडकरी यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची ‘पोलखोल’ करणार असल्याचा इशारा दमानियांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे दिला आहे. या घोषणेमुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दोनच दिवसांपूर्वी दमानियांचे पुढील लक्ष्य नितीन गडकरी असतील, असे भाकीत केले होते, जे खरे ठरले आहे.

दमानिया काय म्हणाल्या?

अंजली दमानिया यांनी आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. “उद्या दुपारपासून मी नितीन गडकरी यांच्याविरुद्ध पोलखोल करायला सुरुवात करणार आहे. त्यांच्या सगळ्या कुकर्मांची पूर्ण मालिकाच सुरू करणार आहे,” असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. दमानिया यांच्या या भूमिकेमुळे आता गडकरींवर नेमके कोणते आरोप होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सुषमा अंधारेंचे भाकीत खरे

दमानियांच्या या भूषिकेवर सुषमा अंधारे यांनी दोनच दिवसांपूर्वी भाष्य केले होते. त्या म्हणाल्या होत्या की, “दमानिया भाजप वगळून इतर सर्वांची प्रकरणे हाती घेतात. परंतु, नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नितीन गडकरी नको आहेत. त्यामुळे दमानियांचे पुढचे टार्गेट गडकरी असल्यास नवल वाटणार नाही.” अंधारे यांचे हे भाकीत आता खरे ठरल्याचे दिसून येत आहे.

पतीच्या नियुक्तीवरूनही वाद

काही दिवसांपूर्वीच अंजली दमानिया यांचे पती अनीश दमानिया यांची राज्य सरकारच्या थिंक टँक ‘मित्रा’ संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली होती. यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि सुषमा अंधारे यांनी दमानियांवर खोचक टीका केली होती. या टीकेवर दमानियांनी उत्तर दिले होते की, “मी सध्या एका खूप मोठ्या प्रकरणावर काम करत आहे. त्यामुळे रोहित पवार आणि सुषमा अंधारे यांनी एक आठवडा थांबावे. त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील, पण माझ्याकडे सध्या वेळ कमी आहे.” या विधानावरूनच दमानिया गडकरींसारख्या मोठ्या नेत्यावर कारवाई करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0