क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Bhiwandi Crime News : व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार; भिवंडीत संतापजनक प्रकार, एका तरुणावर गुन्हा दाखल

Bhiwandi Latest Crime News : बसमधील ओळखीनंतर वर्षभर चालला छळ; आरोपी मारहाणही करायचा

भिवंडी :- बसमधील ओळख एका 34 वर्षीय महिलेसाठी किती धोकादायक ठरू शकते, याचा अनुभव भिवंडीत आला आहे. मोबाईलमधील छायाचित्रे आणि व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देत तिच्या ओळखीच्या एका 32 वर्षीय तरुणाने तिच्यावर वर्षभर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अखेर पीडित महिलेने हिंमत करून पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. Bhiwandi Latest Crime News

काय आहे नेमके प्रकरण?

पीडित महिला आणि आरोपी तरुण यांची ओळख सुमारे वर्षभरापूर्वी बसमधून प्रवास करताना झाली होती. ओळखीनंतर आरोपीने महिलेच्या घरी ये-जा सुरू केली. सुरुवातीला सर्वसामान्य वाटणारा हा तरुण नंतर मात्र महिलेचा छळ करू लागला. त्याने महिलेचे काही छायाचित्र आणि चित्रीकरणही आपल्या मोबाईलमध्ये घेतले होते.

व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

या व्हिडिओ आणि छायाचित्रांचा वापर करत आरोपीने महिलेला ब्लॅकमेल करणे सुरू केले. ‘हे व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित करेन,’ अशी धमकी देऊन तो महिलेवर सातत्याने लैंगिक अत्याचार करत होता. महिलेने विरोध केल्यास तो तिला मारहाणही करत असे.

या सततच्या त्रासाला कंटाळून आणि भविष्यात अधिक धोका पत्करण्याची शक्यता लक्षात घेऊन, महिलेने अखेर निजामपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा धाडसी निर्णय घेतला. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी Bhiwandi Police Latest News भारतीय न्याय संहिता 2023 च्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून, आरोपीला पकडण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0