मुंबई

Kandivali Crime News : कांदिवलीत 24 तासांत दोन हत्यांनी खळबळ, व्यवसायाचीकासह पत्नीचाही खून; पोलीस तपासाला गती

•65 वर्षीय व्यावसायिकाची कारखान्यात निर्घृण हत्या, हल्लेखोर सीसीटीव्हीमध्ये कैद

मुंबई :- कांदिवली परिसरात गेल्या 24 तासांत घडलेल्या दोन वेगवेगळ्या खुनाच्या घटनांनी मोठी खळबळ उडाली आहे. एकीकडे, एका 65 वर्षीय व्यावसायिकाची त्याच्याच कारखान्यात निर्घृण हत्या करण्यात आली, तर दुसरीकडे पतीने क्षुल्लक वादातून आपल्या पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांनी तपास सुरू केला असून, गुन्हेगारांना पकडण्यासाठी वेगाने पावले उचलली आहेत.

कारखान्यात व्यावसायिकाचा खून

कांदिवली, चारकोप येथील शासकीय औद्योगिक वसाहतीमध्ये धातूचा कारखाना असलेले व्यावसायिक मोहम्मद सय्यद (65 वय) यांचा मृतदेह रविवारी सकाळी त्यांच्या कारखान्यात आढळला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारखान्याच्या बाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोन अज्ञात व्यक्ती सय्यद यांच्या कारखान्यात येताना दिसल्या. या दोन्ही हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी ते शस्त्र पाण्याच्या टाकीत फेकून दिले. पोलिसांनी ते जप्त केले आहे.

जवळपास एक तासभर हल्लेखोर कारखान्यात होते, त्यामुळे ते सय्यद यांच्या परिचयाचे असावेत अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. आर्थिक वाद हे या हत्येमागील कारण असू शकते, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. फरार आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी विविध पथके तयार केली असून त्यांचा शोध सुरू आहे.

पैशांच्या वादातून पत्नीचा खून

कांदिवलीतील रामविजय को-ऑप सोसायटीच्या शेडमध्ये राहणाऱ्या एका महिलेचा तिच्या पतीनेच खून केल्याची दुसरी घटना समोर आली आहे. शुक्रवारी मध्यरात्री हिमेंद्र राणा (25 वय) या महिलेची तिचा पती दासा राणा (28 वय) याने गळा दाबून हत्या केली. दोघेही मजूर म्हणून काम करत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दासाला गावी जायचे होते, पण पत्नी हिमेंद्राने त्याला पैसे देण्यास नकार दिला. याच क्षुल्लक कारणावरून त्यांच्यात जोरदार भांडण झाले. या वादातून संतापलेल्या दासाने आपल्या मुलासमोरच चादरीने हिमेंद्राचा गळा आवळून तिचा खून केला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी पती दासाला अटक केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0