मुंबईठाणे
Trending

Sanjay Raut : शिंदे यांनी रोज राजन विचारेंचे पाय धुवून तीर्थ प्राशन केले पाहिजे; संजय राऊतांचा जोरदार हल्ला

Sanjay Raut On Eknath Shinde : राजन विचारेंच्या त्यागामुळेच एकनाथ शिंदे आज मुख्य प्रवाहात आहेत; राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई :- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्यावर जोरदार हल्ला केला आहे. शिंदे यांनी एका जाहिरातीत आनंद दिघे यांचा फोटो वापरल्याच्या वादाला आता नवे वळण मिळाले आहे. राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या राजकीय कारकिर्दीबाबत मोठा गौप्यस्फोट करत, त्यांना राजन विचारे यांच्यामुळेच आजचे स्थान मिळाले आहे, असा दावा केला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले, “एकनाथ शिंदे आज जे काही आहेत ते राजन विचारेंच्या त्यागामुळे आहेत. त्याबद्दल एकनाथ शिंदेंनी रोज राजन विचारेंचे पाय धुवून तीर्थ प्राशन केले पाहिजे.”

या विधानामागचे कारण देताना राऊत यांनी एक जुना प्रसंग सांगितला. “एकनाथ शिंदे यांच्या घरी दुर्दैवाने दुर्घटना घडली (त्यांच्या दोन मुलांचे निधन झाले). तेव्हा ते सैरभैर झाले होते. त्या दुःखातून त्यांना बाहेर काढण्यासाठी राजन विचारे यांनी आनंद दिघे यांच्याकडे प्रस्ताव ठेवला की, एकनाथ शिंदे यांना सभागृह नेते करून कामात सहभागी करून घेऊया,” असे राऊत म्हणाले. हा राजन विचारेंचा त्याग होता आणि त्याला उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिल्याचेही त्यांनी नमूद केले.

शिंदे गटाच्या समर्थकांवर टीका करताना राऊत म्हणाले, “हे आम्हाला काय निष्ठेच्या गोष्टी सांगतात. त्यांची जी लफंगे पोरं रस्त्यावर उतरली आहेत, त्यांना आनंद दिघे, राजन विचारे, सतीश प्रधान, मु दा जोशी कोण आहेत हे माहिती आहेत का?” असा सवालही त्यांनी विचारला. यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0