मुंबईक्राईम न्यूजठाणे

Mira Bhayandar Cyber Fraud : ऑनलाइन गुंतवणूक फसवणुकीतील 1.65 लाख रुपये परत मिळवून देण्यास सायबर पोलिसांना यश

Mira Bhayandar Latest Telegram Cyber Fraud : टेलीग्रामवरील जाहिरातीला भुलून केली होती मोठी गुंतवणूक; परतावा न मिळाल्याने सायबर पोलीस ठाण्यात धाव

मीरा-भाईंदर :- ऑनलाइन फसवणुकीच्या गुन्ह्यात फसवणूक झालेल्या तक्रारदार महिलेची 1.65 लाख रुपये रक्कम परत मिळवून देण्यात सायबर पोलीस ठाण्याला Mira Bhayandar Cyber Police Station मोठे यश मिळाले आहे. मीरा रोड येथे राहणाऱ्या एका महिलेने एका बनावट ऑनलाइन गुंतवणूक ॲपमध्ये पैसे गुंतवून फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली होती. Mira Road Latest Crime News

तक्रारदार महिलेने टेलीग्राम ॲपवर Telegram Cyber Fraud एका ऑनलाइन गुंतवणूक ॲपची जाहिरात पाहिली. त्यात अधिक परतावा मिळवण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. अधिक पडताळणी न करताच त्यांनी मोठी रक्कम गुंतवली. मात्र, कोणताही परतावा न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या तक्रारीची तात्काळ दखल घेत पोलिसांनी फसवणुकीची रक्कम ज्या वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये वळती झाली होती, ती गोठवली. त्यानंतर पोलिसांनी तक्रारदाराला न्यायालयात याचिका दाखल करण्यास सांगितले. न्यायालयाने आदेश दिल्यानंतर आणि पोलिसांनी बँकांशी केलेल्या पाठपुराव्यानंतर अखेर फसवणुकीची संपूर्ण रक्कम 1.65 लाख रुपये तक्रारदारांच्या मूळ बँक खात्यात परत जमा करण्यात आली.

या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सायबर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर यांच्यासह त्यांच्या संपूर्ण पथकाचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0