क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Panvel Robbery News : पनवेल हादरलं! जबरी चोरी करणार्‍या टोळीचा पर्दाफाश – गुन्हे शाखा कक्ष ३ कडून धडक कारवाई

पनवेल | कळंबोली सिग्नलवर सिमेंट बल्कर चालकाला वस्तरा दाखवून लुटणाऱ्या भयावह टोळीचा पनवेल गुन्हे शाखेने Panvel Crime Branch पर्दाफाश केला आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी तीन कुख्यात गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या असून, आरोपींकडून दोन जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. Panvel Latest Crime News

दिनांक १४ सप्टेंबर रोजी रात्री, स्कुटीवरून आलेल्या तिघा इसमांनी चालकाला अडवले. वस्तरा दाखवत पैशांची मागणी केली आणि बन प्लस कंपनीचा मोबाईल फोन जबरीने हिसकावून नेला.


सदर गुन्ह्याची नोंद कळंबोली पोलीस ठाण्यात गु.र.नं. २१०/२०२५ अंतर्गत करण्यात आली होती.

गुन्हे शाखा कक्ष-३ पनवेलने तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपींचा शोध लावला.
अटक आरोपी –
1️⃣ प्रथमेश वासुदेव तरे (२४)
2️⃣ समीर श्रीधर पेडणेकर (२६)
3️⃣ साहिल उदय खैरे (२३)

या तिघांना १७ सप्टेंबर रोजी अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना २० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.Panvel Police Latest News

उघड झालेले गुन्हे

▪️ कळंबोली पोलीस ठाणे – गु.र.नं. २१०/२०२५
▪️ खांदेश्वर पोलीस ठाणे – गु.र.नं. २४४/२०२५

तपासात आरोपींनी कबुल केले की त्यांनी दोन्ही ठिकाणी जबरी चोरीचे गुन्हे केले आहेत.

आरोपींचा काळा इतिहास

विशेषतः समीर पेडणेकर व प्रथमेश तरे यांच्यावर यापूर्वी मुंबईतील काळाचौकी व वडाळा पोलीस ठाण्यांत खूनाचा प्रयत्न, लूटमार, एनडीपीएस आणि मारामारीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांची कामगिरी

ही धडक कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश काळदाते यांच्या नेतृत्वात सपोनि पवन नांद्रे, पोउपनि अभयसिंह शिंदे व त्यांच्या पथकाने केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0