मुंबई

बेकायदेशीर बेटिंग ॲप प्रकरणात युवराज सिंग आणि रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स

•1xBet प्रकरणात चौकशीसाठी 23 सप्टेंबरला दिल्लीतील मुख्यालयात हजर राहण्याचे निर्देश ; अंबि व्हॅलीतील मालमत्ता खरेदी प्रकरणातही ईडीचा तपास सुरू

ANI :- भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बेकायदेशीर बेटिंग ॲप १xBet प्रकरणात समन्स बजावले आहे. याच प्रकरणात माजी खेळाडू रॉबिन उथप्पा यालाही समन्स बजावण्यात आले असून, दोघांनाही २३ सप्टेंबर रोजी दिल्लीतील ईडीच्या मुख्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.

नेमकं प्रकरण काय?

1xBet सारख्या अनेक बेकायदेशीर बेटिंग ॲप्सची ईडी सध्या चौकशी करत आहे. या ॲप्सने कोट्यवधी रुपयांची फसवणूक आणि करचोरी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणांमध्ये अनेक सेलिब्रिटी आणि खेळाडूंची नावे समोर आल्याने ईडी या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. याआधीही सुरेश रैना, शिखर धवन आणि हरभजन सिंग यांचीही याच प्रकरणात चौकशी झाली आहे.

अंबि व्हॅलीतील मालमत्ता खरेदी

ईडीच्या समन्सनुसार युवराज सिंग आणि रॉबिन उथप्पा यांच्या चौकशीचे कारण फक्त बेटिंग ॲप नाही, तर सहारा ग्रुपच्या महाराष्ट्रातील अंबि व्हॅली प्रकल्पाशी संबंधित ३०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणाचाही यात समावेश आहे. युवराज आणि उथप्पा यांनी अंबि व्हॅली ग्रुपच्या गुंतवणूक कार्यक्रमाचा भाग म्हणून या प्रकल्पात मालमत्ता खरेदी केली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0