महाराष्ट्र

Baramati News : बारामती-इंदापूरमध्ये मुसळधार पाऊस,नाले, ओढ्यांना पूर आल्याने शेती आणि घरांमध्ये शिरले पाणी

•प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन

बारामती :- बारामती आणि इंदापूर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. ओढे आणि नाले तुडुंब भरून वाहत असल्याने अनेक शेती पाण्याखाली गेली असून, घरांमध्येही पाणी शिरले आहे. या परिस्थितीमुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून, बारामती-इंदापूर रस्त्यावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं?

रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली आणि रात्रभर दोन्ही तालुक्यांमध्ये पावसाची संततधार कायम होती. याचा परिणाम म्हणून इंदापूर तालुक्यातील सणसर येथील पूल पाण्याखाली गेला आहे. संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर असणाऱ्या या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे.

याशिवाय, काझड येथे पावसाच्या पाण्यामुळे जोड कालवा फुटल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरले असून, जीवनावश्यक वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे.

हवामान विभागाने आजही मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने, स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0