क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Vasai Latest Crime News : वसईमध्ये मोठा दरोड्याचा कट उधळला; 11 सराईत गुन्हेगार गावठी कट्ट्यासह जेरबंद

Vasai Police Guns And Knifes From Criminal : चॉपर, मिरची पावडर, दोरीसह 1.77 लाखांचा मुद्देमाल जप्त; अनेक गुन्हे उघडकीस

वसई :- मीरा-भाईंदर पोलिसांच्या गुन्हे Mira Bhayandar Police Crime Branch प्रकटीकरण शाखेने एका मोठ्या दरोड्याचा कट उधळून लावत 11 सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. गावठी कट्टा, जिवंत काडतुसे आणि इतर प्राणघातक शस्त्रांसह दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांना रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे वसई, मुंबई आणि ठाणे परिसरातील गुन्हेगारीला मोठी खीळ बसली आहे. Mira Bhayandar Latest Crime News

नेमकी घटना काय?

9 सप्टेंबर, 2025 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास गुन्हे शाखा कक्ष-2, वसई येथील पोलिसांना एका गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, एव्हरशाईन सिटीमधील राम रहीम नगर परिसरात एका बंगल्यावर दरोडा घालण्यासाठी 10 ते 12 जण एकत्र येणार आहेत. त्यांच्याकडे गावठी कट्टा आणि इतर घातक शस्त्रे आहेत.

ही माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष-2, माणिकपूर, वालीव आणि आचोळे पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी संयुक्त कारवाईचे नियोजन केले. पोलिसांनी सापळा रचून राम-रहीम को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या इमारतीजवळून 11 संशयितांना ताब्यात घेतले.

अटक केलेल्या आरोपींची नावे

1.कुमार विलास साबळे (वय 29)

2.ईब्राउद्दिन ईत्रार चौधरी (वय 24)

3.कार्तिक कुमार सुशील सिंग (वय 24)

4.गुरुप्रितसिंग अजित सिंग लबाना उर्फ बच्या (वय 30)

5.कैलास सुदाम चिखले (वय 51)

6.विष्णु सोमनाथखरात (वय 21)

7.सचिन शंकर भालेराव (वय 26)

8.विक्रम बाळकृष्ण हरिजन (वय 22)

9.रमजान शब्बीर कुरेशी (वय 24)

10.गणेश रामचंद्र भासले (वय 30)

11.गणेश अप्पा जाधव (वय 19)

आरोपींकडून गावठी कट्टा आणि शस्त्रे जप्त

अटक केलेल्या आरोपींची झडती घेतली असता त्यांच्याकडून गुन्हेगारी कृत्य करण्यासाठी वापरली जाणारी अनेक साधने सापडली. यामध्ये एक देशी बनावटीचा कट्टा, चार जिवंत काडतुसे, एक चाकू, चॉपर, कटावणी, हातोडी, मिरची पावडर, प्लॅस्टिकची दोरी, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 1 लाख 77 हजार 060 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पुणे, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील सराईत गुन्हेगारांचा समावेश आहे.

या सर्व आरोपींनी जमावबंदी आणि शस्त्रास्त्र बाळगण्यास मनाई आदेशाचा भंग करून एकत्र येऊन दरोडा टाकण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त निकेत कौशिक आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत उत्कृष्टपणे पार पाडण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0