क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Vasai Crime News : वसईतील दोन हातभट्ट्यांवर पोलिसांचा छापा; दोन आरोपी जेरबंद

Vasai Crime Branch Unit 2 Latest News : पांजू बेटावर गुन्हे प्रकटीकरण कक्ष-2 ची धडक कारवाई, 30 लाखांची गावठी दारू नष्ट

वसई :- वसई-विरार गुन्हे प्रकटीकरण Vasai Crime Branch Unit 2 कक्षाच्या (क्राईम ब्रँच) पथकाने नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पांजू बेटावर एकाच वेळी दोन ठिकाणी छापा मारून बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या दोन मोठ्या हातभट्ट्या उध्वस्त केल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी 30 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट केला असून, दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. Vasai Crime Branch Busted Daru Adda

4 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी, गुन्हे प्रकटीकरण कक्ष-2, वसई येथील पोलीस निरीक्षक अविराज कुराडे आणि पोलीस उपनिरीक्षक संतोष घाडगे यांच्या नेतृत्वाखाली दोन स्वतंत्र पथके नायगाव हद्दीतील पांजू बेटावर अवैध व्यवसायांचा शोध घेण्यासाठी रवाना झाली होती. त्यावेळी, पोलिसांना त्यांच्या गुप्त बातमीदारांकडून दोन वेगवेगळ्या ठिकाणी हातभट्ट्या सुरू असल्याची माहिती मिळाली.

बेकायदेशीर दारू निर्मिती करणाऱ्या दोन मोठ्या केंद्रांचा पर्दाफाश

पहिली कारवाई

पोलिसांनी पहिल्या कारवाईत द्वारकानाथ पाटील आणि पुंडलिक म्हात्रे यांना गावठी दारू तयार करताना रंगेहाथ पकडले. पोलिसांनी घटनास्थळावरून 150 लिटर तयार गावठी दारू, 32 हजार 400 लिटर दारू बनवण्यासाठी वापरला जाणारा ‘वॉश’ आणि इतर सामग्री असा एकूण 17 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत द्वारकानाथ पाटील याला अटक करण्यात आली असून, त्याचा सहकारी पुंडलिक म्हात्रे फरार झाला आहे.

दुसरी कारवाई

दुसऱ्या कारवाईत, पोलिसांनी छोट्या पांजू बेटावर (भाईंदरची खाडी) छापा टाकून तुषार महेश पाटील याला ताब्यात घेतले. याठिकाणी पोलिसांनी 90 लिटर तयार गावठी दारू, 23 हजार 800 लिटर ‘वॉश’ आणि दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले. या कारवाईतील मुद्देमालाची किंमत 12 लाख 90 हजार रुपये आहे.

पोलिसांनी दोन्ही ठिकाणच्या गावठी दारूचे नमुने तपासणीसाठी घेऊन, उर्वरित सर्व मुद्देमाल जागीच नष्ट केला आहे. या प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, पोलीस उपनिरीक्षक संतोष घाडगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही यशस्वी कारवाई केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0