मुंबई

Mumbai MegaBlock News : रविवारच्या प्रवासाचे नियोजन करा; मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक जाहीर

Mumbai Local Train Update : मुख्य मार्गावरील लोकल 15 मिनिटे उशिराने, तर हार्बर मार्गावरील लोकल रद्द

मुंबई :- मुंबईकरांना रविवारी प्रवासाचे नियोजन करताना काळजी घ्यावी लागणार आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे दोन्ही मार्गांवर उद्या, रविवारी (8 सप्टेंबर) अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे लोकल सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. Mumbai Local Train Update

मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक

मुख्य मार्ग माटुंगा-मुलुंड सकाळी 11.05 ते दुपारी 3.45 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटणाऱ्या डाऊन जलद लोकल माटुंगा ते मुलुंडदरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. यामुळे त्या त्यांच्या इच्छित स्थानकावर सुमारे 15 मिनिटे उशिराने पोहोचतील. त्याचप्रमाणे, ठाण्याहून सुटणाऱ्या अप जलद लोकल मुलुंड ते माटुंग्यादरम्यान धीम्या मार्गावर चालवल्या जातील आणि त्याही 15 मिनिटे उशिराने पोहोचतील.

हार्बर मार्ग मेगाब्लॉक

पनवेल-वाशी सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 पनवेल-सीएसएमटी आणि सीएसएमटी-पनवेल मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत.पनवेल-ठाणे आणि ठाणे-पनवेल मार्गावरील ट्रान्सहार्बर लोकलही रद्द असतील.प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी-वाशीदरम्यान विशेष लोकल चालवण्यात येतील.

ठाणे-वाशी/नेरूळ दरम्यान ट्रान्सहार्बर मार्गावर आणि पोर्ट मार्गावर लोकल सेवा सुरू राहील.

पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक

सांताक्रूझ-गोरेगाव सकाळी 10 ते दुपारी 3 या कालावधीत सर्व जलद लोकल गोरेगाव ते सांताक्रूझदरम्यान धीम्या मार्गावर धावतील. काही लोकल सेवा रद्द होण्याची शक्यता आहे. अंधेरी आणि बोरिवलीसाठी जाणाऱ्या काही लोकल हार्बर मार्गावरून गोरेगावपर्यंत चालवल्या जातील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0