पुणे
Trending

Pimpari Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत विजेचा धक्का; दोन तरुण गंभीर जखमी

Pimpari Chinchwad Ganpati Visarjan Accident : डीजेच्या गाडीचा विजेच्या खांबाला धक्का, तुटलेली तार अंगावर पडल्याने दुर्घटना

पिंपरी-चिंचवड :- गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत विजेच्या धक्क्याने दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना पिंपरी-चिंचवडमधील मोहननगर येथे रात्री अकराच्या सुमारास घडली. प्रवीण राजेंद्र कुटे आणि अमोल सदाशिव चव्हाण अशी जखमी तरुणांची नावे आहेत. Pune Latest News

मोहननगर येथील काली माता मंदिरासमोर गणेश विसर्जन मिरवणूक मोठ्या जल्लोषात सुरू होती. डीजेच्या तालावर गणेश भक्त नाचत होते. याचवेळी डीजेच्या गाडीचा धक्का विजेच्या खांबाला लागला. त्यामुळे विजेची तार तुटून ती थेट प्रवीण आणि अमोल यांच्या अंगावर पडली. विजेचा जोरदार धक्का बसल्याने दोघेही जागेवर कोसळले.

या घटनेनंतर तात्काळ दोघांनाही जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलिसांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना बोलावून तुटलेली विजेची तार तात्काळ दुरुस्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0