क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Mira Road Illegal Medicine Racket : मिरा रोडमध्ये बेकायदेशीर औषधसाठ्यावर छापा : ₹३.२१ लाखांचा मुद्देमाल जप्त

मिरा रोड | 5 सप्टेंबर 2025 गुन्हे प्रकटीकरण कक्ष–१, काशिमीरा पोलिसांनी Kashmira Police मिरा रोड परिसरात मोठी कारवाई करत परिशिष्ट ‘एच’ प्रकारातील औषधांचा अवैध साठा जप्त केला. या कारवाईत TERMIVA (Mephentermine Sulphate Injection IP) या औषधाच्या तब्बल ६४० बाटल्या तसेच इतर इंजेक्शन व औषधे मिळून ₹३,२१,१०२/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. Mira Road Latest Crime News

मिळालेल्या माहितीवरून पोलिसांना समजले की, के–५ फिटनेस अँड वेलनेस सेंटर, शॉप नं. ०८, आकार सोसायटी, मिरा रोड पूर्व येथे कोणत्याही वैद्यकीय प्रिस्क्रिप्शनशिवाय हे औषध शरीरसौष्ठव करणाऱ्यांना व युवकांना सर्रास विकले जात आहे. औषध निरीक्षकांच्या उपस्थितीत ३ सप्टेंबर रोजी छापा टाकला असता, दुकानातून TERMIVA Injection च्या ४०७ बाटल्या तसेच इतर औषधांचा साठा आढळला.

यानंतर आरोपींच्या राहत्या घरी (नर्मदा पॅराडाईज, भाईंदर पूर्व) झडती घेतली असता, अतिरिक्त २३३ बाटल्या जप्त करण्यात आल्या. एकूण ६४० बाटल्या व इतर परिशिष्ट ‘एच’ प्रवर्गातील औषधे पोलिसांनी ताब्यात घेतली.

या कारवाईत दुकानमालक कन्हैय्या वकिल कनौजिया व त्याचा साथीदार अमन कृष्णा कनोजीया (१९) यांची नावे समोर आली आहेत. अमन कनोजीया पोलिसांच्या ताब्यात असून कन्हैय्या कनोजियाचा शोध सुरू आहे.

या प्रकरणी मिरा रोड पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४०२/२०२५ नोंदवून आरोपींवर भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १२५ तसेच औषधी द्रव्य व सौंदर्यप्रसाधन अधिनियम १९४० चे कलम १८(सी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रकटीकरण) मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ऑपरेशनमध्ये प्रभारी पोलीस निरीक्षक सुशिलकुमार शिंदे व त्यांच्या पथकाने सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0