मुंबई
Trending

Milind Deora : ‘मुंबईत आंदोलनाला परवानगी देऊ नका’: मिलिंद देवरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Milind Deora Wrote Letter To CM : संजय राऊतांचा शिंदे गटावर निशाणा, म्हणाले ‘अमित शहा पुरस्कृत गटाचा खरा चेहरा’

मुंबई :- मराठा आरक्षणासाठी मुंबईत झालेल्या आंदोलनानंतर आता राजकीय वर्तुळात नवा वाद सुरू झाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे खासदार मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून दक्षिण मुंबईत यापुढे कोणत्याही आंदोलनाला परवानगी न देण्याची मागणी केली आहे. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे.

देवरांच्या पत्रातील प्रमुख मुद्दे

आपल्या पत्रात मिलिंद देवरा यांनी म्हटले आहे की, लोकशाहीत निषेध करण्याचा प्रत्येकाला अधिकार असला तरी, तो सामान्य नागरिकांच्या जगण्याच्या अधिकाराशी संतुलित असला पाहिजे. त्यांनी दक्षिण मुंबईला राज्याचे राजकीय आणि आर्थिक केंद्र म्हटले असून, येथे मंत्रालय, विधानसभा, पोलीस कार्यालये, आणि महत्त्वाच्या वित्तीय संस्था आहेत. या भागात होणाऱ्या वारंवारच्या निदर्शनांमुळे प्रशासनाचे कामकाज विस्कळीत होते आणि त्याचा परिणाम लाखो लोकांवर होतो.

“जगातील कोणत्याही राजधानीचे शहर आपल्या प्रशासन, सुरक्षा आणि अर्थव्यवस्थेच्या मुख्य संस्थांना वारंवार निदर्शनांमुळे अपंग होऊ देत नाही,” असे देवरा यांनी पत्रात म्हटले आहे. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्र सरकारला दक्षिण मुंबईत अशा निदर्शनांना प्रतिबंधित करण्याची किंवा ती इतरत्र स्थलांतरित करण्याची विनंती केली आहे.

संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल

देवरांच्या या पत्रावरून संजय राऊत यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली. त्यांनी म्हटले की, “अमित शहा पुरस्कृत शिंदे गटाचा हाच खरा चेहरा आहे.” मुंबईत मराठी माणूस त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी एकवटल्याने यांची पोटदुखी उघड झाली आहे, असा आरोप राऊत यांनी केला.

याचवेळी त्यांनी शिंदे गटाला बाळासाहेब ठाकरेंचा फोटो वापरणे बंद करण्याचा सल्ला दिला. “शिंदे गटाचे खासदार मिलिंद देवरा यांनी दक्षिण मुंबईत मराठी माणसाच्या आंदोलनास परवानगी देऊ नये, असे मुख्यमंत्र्यांना लिहिले. हेच त्यांचे खरे स्वरूप आहे,” असे म्हणत राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0