Pune Police News : पिंपरी-चिंचवड पोलिसांची धडक मोहीम! 50 पिस्तुलं आणि 116 धारदार शस्त्रे जप्त

Pune Police Latest News : 20 दिवसांत 40 गुन्हे दाखल, 45 आरोपींना अटक; शहरात गुन्हेगारीला लगाम लावण्याचा प्रयत्न
पिंपरी-चिंचवड :- पिंपरी-चिंचवड शहरात गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी धडक मोहीम राबवली आहे. या मोहिमेअंतर्गत गेल्या 20 दिवसांत पोलिसांनी तब्बल 59 पिस्तुलं आणि 116 धारदार शस्त्रे जप्त केली आहेत. या कारवाईत अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे. Pune Pimpari Chinchwad Latest News
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली 13 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2025 या काळात पिंपरी-चिंचवड पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेच्या युनिट्सने ही विशेष मोहीम राबवली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात अवैधरित्या पिस्तुल बाळगणाऱ्या 40 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, 45 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 50 पिस्तुलं आणि 79 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
याशिवाय, धारदार शस्त्रे बाळगणाऱ्यांविरोधातही पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. याप्रकरणी 94 गुन्हे दाखल करून 66 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 92 कोयते आणि 12 तलवारी अशा एकूण 116 धारदार शस्त्रांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरात गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ही मोहीम महत्त्वाची ठरली आहे.



