काशिमीरा पोलिसांची धडक कारवाई : स्टार नाईट ऑर्केस्ट्रा बारवर छापा, १२ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

काशिमीरा | काशिमीरा पोलिस ठाणे Kashmira Police Station कार्यक्षेत्रातील स्टार नाईट ऑर्केस्ट्रा बार येथे महिलांकडून अश्लील नृत्य करवून घेत असल्याची माहिती पोलीस उप आयुक्त (परिमंडळ १) राहुल चव्हाण यांना मिळाली होती. या माहितीनुसार पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. Kashmira Police Latest News
१ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या या कारवाईत, पोलिसांनी बारमध्ये महिला सिगरकरांकडून अश्लील नृत्य चालू असल्याचे उघडकीस आणले. याप्रकरणी बार मालक परमेश सिद्धप्पा लिंगायत, चालक मंजूनाथ विराण्णा लिंगायत यांच्यासह एकूण १२ आरोपींविरुद्ध काशिमीरा पो.ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हा गुन्हा रजि. क्र. ३८४/२०२५, महाराष्ट्र हॉटेल, उपहारगृहे आणि मद्यपान कक्ष (बार रुम) यामध्ये अश्लील नृत्यांवर प्रतिबंध घालण्याचा व महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याच्या अधिनियम २०१६ चे कलम ३, ८(१), ८(२) अन्वये दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी ₹६४,००० रोख रक्कम जप्त केली असून ५ पीडित महिलांची मुक्तता करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ-१) राहुल चव्हाण यांच्या अधिपत्याखाली परिमंडळ-१ चे पथक व काशिमीरा पोलिस ठाण्याचे अधिकारी/अंमलदार यांनी संयुक्तपणे केली.



