मुंबई
Trending

MLA Rais Shaikh : ईद-ए-मिलादचा जुलूस 8 सप्टेंबरला, शासनाने सुट्टी जाहीर करावी: आमदार रईस शेख

MLA Rais Shaikh On Eid Holiday : गणेश विसर्जन आणि ईद एकाच वेळी आल्याने निर्णय; हिंदू-मुस्लीम एकोपा कायम ठेवण्यासाठी मागणी

मुंबई :- मुस्लीम समाजासाठी पवित्र असलेला मोहम्मद पैगंबर साहेबांचा जन्मदिवस यंदा शुक्रवारी, 5 सप्टेंबर रोजी येत आहे, तर शनिवारी, 6 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन (अनंत चतुर्दशी) आहे. यामुळे हिंदू-मुस्लीम एकोपा अबाधित राहावा या उद्देशाने ईद-ए-मिलादचा जुलूस 8 सप्टेंबर रोजी काढण्याचा निर्णय ऑल इंडिया खिलाफत कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी या दिवशी राज्य शासनाने शासकीय सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांच्याकडे केली आहे.

आमदार रईस शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत विविध मुस्लीम संघटनांच्या बैठकीत हा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला आहे. गणेश विसर्जन आणि ईद-ए-मिलाद हे दोन्ही सण शांततेत आणि सौहार्दपूर्ण वातावरणात साजरे करता यावेत, यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय संपूर्ण राज्यात लागू होईल, असेही आमदार शेख यांनी सांगितले.

या मागणीमुळे दोन्ही समाजांतील सलोखा आणि शांतता कायम ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे. आता राज्य सरकार या मागणीवर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0