Mumbai Drug Dealer : ड्रग्ज पेडलरला 15 वर्षांचा कारावास, मुंबई पोलिसांचे मोठे यश!

Mumbai Police Arrested Drug Dealer : 1 लाख रुपये दंड आणि तुरुंगवास; 22 ऑगस्ट रोजी न्यायालयाने सुनावली शिक्षा
मुंबई: मुंबईतील तरुणांना अंमली पदार्थ विकणाऱ्या एका कुख्यात ड्रग पेडलरला Mumbai Drug Dealer न्यायालयाने 15 वर्षांचा सश्रम कारावास आणि 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने केलेल्या प्रभावी तपासामुळे हे मोठे यश मिळाले आहे. Mumbai Latest Drug News

या प्रकरणी, 12 मे 2022 रोजी बांद्रा युनिटच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने गस्त घालत असताना समीर शब्बीर शेख उर्फ ‘पानीपुरी’ याला अटक केली होती. त्याच्याकडून तब्बल 110 ग्रॅम वजनाचा मेफेड्रॉन (M.D.) हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला होता. त्यानंतर, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत कारकर यांनी या गुन्ह्याचा तपास अत्यंत कौशल्यपूर्ण आणि सखोलपणे केला. त्यांनी योग्य वेळेत विशेष सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. आरोपी समीर शेख हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वीही अंमली पदार्थांचे गुन्हे तसेच चोरी, विनयभंग यांसारखे एकूण 9 गुन्हे दाखल आहेत.
22 ऑगस्ट 2025 रोजी या गुन्ह्याची सुनावणी पूर्ण झाली. न्यायालयाने सादर केलेले पुरावे आणि पोलिसांचा तपास ग्राह्य धरून आरोपी समीर शेखला दोषी ठरवले. त्याला 15 वर्षांचा कारावास आणि 1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दंड न भरल्यास आणखी सहा महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे आणि सहायक पोलीस आयुक्त सुधीर हिरडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
यात तत्कालीन प्रभारी पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, प्रभारी पोलीस निरीक्षक विशाल चंदनशिवे, तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत कारकर, फिर्यादी पोलीस शिपाई अतुल सौदाणे आणि न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस हवालदार रंगनाथ घुगे, महिला पोलीस हवालदार मोहना आव्हाड, महिला पोलीस शिपाई दिप्ती दरेकर आणि सुदक्षीना नेहे यांचा महत्त्वाचा सहभाग होता.


