ठाणेमुंबई
Trending

Best Election : बेस्ट सोसायटीच्या निवडणुकीत ‘एओडब्लू’ची एन्ट्री, चुरस वाढली

Best Election Latest Update : 24 कोटींच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी ईओडब्ल्यूकडून संचालकांना नोटीस; निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता

मुंबई :- मुंबईतील ‘बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी’च्या बहुप्रतिक्षित निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले. गेली चार वर्षे रखडलेल्या या निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि मनसे यांनी एकत्र येत ‘उत्कर्ष पॅनल’च्या माध्यमातून जोरदार आघाडी घेतली आहे. तर दुसरीकडे, महायुतीने ‘सहकार समृद्धी पॅनल’ रिंगणात उतरवून ठाकरे गटाला थेट आव्हान दिले आहे. Mumbai Best Election Update

या निवडणुकीची खरी रंगत वाढली ती ऐन मतदानाच्या आदल्या दिवशी. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केलेल्या 24 कोटींच्या कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) निवडणुकीच्या रिंगणातील 21 संचालकांना चौकशीसाठी नोटीस पाठवली. विशेषतः, शिवसेनेचे अध्यक्ष उमेश सारंग आणि बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांच्या चौकशीची मागणी लाड यांनी केली होती. मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना अचानक आलेल्या या नोटिसांमुळे निवडणुकीत खळबळ उडाली असून, या घटनेचा मतदानाच्या निकालावर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ठाकरे बंधूंनी साधली युती

ही निवडणूक ‘उत्कर्ष पॅनल’मध्ये ठाकरे गट आणि मनसे एकत्र आल्यामुळे विशेष चर्चेत आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वीची ‘लिटमस टेस्ट’ म्हणूनही या निवडणुकीकडे पाहिले जात आहे. ‘उत्कर्ष पॅनल’मधील 21 पैकी 19 जागांवर ठाकरे गट, तर दोन जागांवर मनसेचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये या युतीमुळे उत्साह संचारला असून, निवडणुकीच्या काही दिवस आधी शिंदे गटाच्या बबिता पवार यांनी ठाकरे-मनसे पॅनेलमध्ये प्रवेश केल्याने त्यांची ताकद वाढली आहे.

या निवडणुकीचा निकाल उद्या, मंगळवारी जाहीर होणार असून, ठाकरे गट आणि मनसेची युती यशस्वी होते की महायुती बाजी मारते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. विशेषतः, आर्थिक गुन्हे शाखेच्या भूमिकेमुळे या निवडणुकीच्या निकालाला वेगळीच किनार प्राप्त झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0