मुंबई

Mumbai News : मुंबईत डिलिव्हरी बॉयवर माथेफिरूचा गोळीबार, परळमधील घटनेने खळबळ

सतत बेल वाजवल्याच्या रागातून एअर रायफलने हवेत फायरिंग

मुंबई :- राजधानी मुंबईत एका धक्कादायक घटनेने खळबळ उडवून दिली आहे. परळमधील (Parel) एका इमारतीत ऑनलाइन औषध डिलिव्हरी करणाऱ्या डिलिव्हरी बॉयवर एका व्यक्तीने एअर रायफलने हवेत गोळीबार (Firing) केल्याची घटना समोर आली आहे. डिलिव्हरी बॉयने सतत बेल वाजवून त्रास दिल्याच्या रागातून आरोपीने हे कृत्य केले. या घटनेमुळे परिसरात एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ही घटना परळ पूर्व येथील ना. म. जोशी मार्गावरील एका इमारतीत घडली. सौरभकुमार अविनाशकुमार सिंग नावाच्या एका व्यक्तीने ऑनलाइन मेडिकल ॲपवरून औषध ऑर्डर केले होते. डिलिव्हरी बॉय त्याची ऑर्डर घेऊन बिल्डिंगमध्ये पोहोचला. मात्र, सौरभ दरवाजा उघडत नसल्याने डिलिव्हरी बॉयने दोन ते तीन वेळा घराची बेल वाजवली.

एका क्लिकने हवेत गोळीबार
बेलचा आवाज ऐकून संतप्त झालेल्या सौरभने तातडीने दरवाजा उघडला आणि आपल्याकडील एअर रायफलने डिलिव्हरी बॉयच्या दिशेने रोखून हवेत गोळीबार केला. सुदैवाने या घटनेत कोणालाही इजा झाली नाही, मात्र डिलिव्हरी बॉय प्रचंड घाबरला. त्याने तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी सौरभला ताब्यात घेतले. पोलिसांनी सौरभच्या घरातून एअर रायफल जप्त केली असून, या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0