क्राईम न्यूजमुंबई
Trending

मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई; 15 लाखांचे ‘एमडी’ ड्रग्ज जप्त, दोघांना अटक

Mumbai Police Latest Drug News : एका 42 वर्षीय आणि एका 27 वर्षीय आरोपीला अटक; ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश

मुंबई :- मुंबईतील काळाचौकी पोलिसांनी एका गुप्त बातमीदाराच्या माहितीच्या आधारावर मोठी कारवाई करत दोन अंमली पदार्थ तस्करांना अटक केली आहे. Mumbai Latest Drug News त्यांच्याकडून सुमारे 15 लाख 40 हजार रुपये किमतीचे 77 ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) हे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई 10 ऑगस्ट रोजी कॉटनग्रीन परिसरात करण्यात आली. Mumbai Latest Crime News

मिळालेल्या माहितीनुसार, काळाचौकी पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून खबर मिळाली होती की, कॉटनग्रीन रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या एका ठिकाणी दोन व्यक्ती अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहेत. या माहितीच्या आधारे, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी एक पथक तयार केले आणि त्या ठिकाणी छापा टाकला.

पोलिसांनी केलेल्या या कारवाईत समिर भाई हिंमत भाई बाल्लार (वय 42) आणि मोहम्मद शकील अहमद यार मोहम्मद खान (वय 27) या दोघांना पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्याजवळ तपासणी केली असता, 77 ग्रॅम मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ आढळला.

पोलिसांनी दोन्ही आरोपींवर एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, सह पोलीस आयुक्त सत्यनारायण, अप्पर पोलीस आयुक्त विक्रम देशमाने आणि पोलीस उप आयुक्त रागसुधा आर. यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक हसन मुलाणी, पोलीस उपनिरीक्षक धंनजय व्यवहारे तसेच पोलीस हवालदार चन्ने, पोलीस शिपाई पवार, नाईकवाडी, कुभार आणि कोळेकर यांचा सहभाग होता. या यशस्वी कारवाईमुळे मुंबईतील ड्रग्ज तस्करीच्या रॅकेटला मोठा धक्का बसला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0