मुंबई

Maharashtra Monsoon Update : राज्यात पावसाचे पुनरागमन; बुधवारपासून मुसळधार पावसाचा अंदाज

•कोकण आणि विदर्भात ‘यलो अलर्ट’, रत्नागिरी-सिंधुदुर्गात 14 ऑगस्टला जोरदार पाऊस अपेक्षित

मुंबई :- गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने ओढ दिली होती, त्यामुळे शेतकरी चिंतेत होते. मात्र, आता हवामान विभागाने पुन्हा एकदा जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. बुधवार, 13 ऑगस्टपासून मुंबईसह राज्याच्या अनेक भागांत मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

बंगालच्या वायव्य उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्यामुळे 12 ते 14 ऑगस्टदरम्यान विदर्भ आणि कोकणात काही ठिकाणी जोरदार पाऊस अपेक्षित आहे. 14 ऑगस्ट रोजी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो, तर मध्य महाराष्ट्रातील काही भागातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’

विदर्भातील गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी 13 आणि 14 ऑगस्ट रोजी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. यामुळे या भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या या अंदाजामुळे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0