क्राईम न्यूजपुणे
Trending

Pune Chain Snacher News : मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावणारा चोरटा 24 तासांत जेरबंद

Pune Deccan Police Latest News : डेक्कन पोलिसांची मोठी कामगिरी; सीसीटीव्ही आणि गुप्त बातमीदाराच्या माहितीमुळे आरोपी जेरबंद

पुणे :- मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका 61 वर्षीय महिलेचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून पळून गेलेल्या चोरट्याला डेक्कन पोलिसांनी 24 तासांच्या आत अटक केली आहे. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने तपास केला.

3 ऑगस्ट रोजी सकाळी मंजुरंजन बिल्डिंगच्या गेटजवळ, लॉ कॉलेज रोडवर एक महिला मॉर्निंग वॉकवरून घरी परत येत होत्या. त्याचवेळी एका अनोळखी व्यक्तीने त्यांना धक्का देऊन खाली पाडले आणि त्यांच्या गळ्यातील 12 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला होता. या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गंभीर गुन्ह्याची नोंद घेत अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आरोपीला तात्काळ पकडण्याचे आदेश दिले. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपासाला सुरुवात केली.

पोलिसांनी शहरातील विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजमधील अस्पष्ट चेहऱ्यावरून आरोपीचा माग काढत असताना, पोलीस अंमलदार मयूर भोसले आणि अमित जमदाडे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली. आरोपीसारखा दिसणारा एक व्यक्ती दिप बंगला चौकात राहतो, अशी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली.

या तपासामुळे राजु वामन खुडे (40 वय) याला पोलिसांनी इशांन हॉटेलजवळून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला पुढील कारवाईसाठी डेक्कन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखालील या पथकात सहाय्यक पोलीस फौजदार राहुल मखरे, विनोद शिंदे यांच्यासह अनेक पोलीस अंमलदार सहभागी होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0