क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Ulhasnagar Crime News: साजिद शेख हत्याकांडातील आरोपींना अटक

Ulhasnagar Police Arrested Sajid Shaikh Murder : पोलिसांच्या कारवाईमुळे विश्वास वाढला; अजूनही पाच आरोपी फरार

उल्हासनगर :- उल्हासनगर शहरात काही दिवसांपूर्वी झालेल्या साजिद शेख हत्या प्रकरणाचा तपास आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आणखी दोन आरोपींना अटक केली असून, आतापर्यंत एकूण चार आरोपींना अटक करण्यात यश आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे विशाल बेरभैया आणि दिनेश जाधव अशी आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता, पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या हत्येच्या घटनेनंतर, आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांनी शेकडो सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक साधनांच्या मदतीने त्यांच्या प्रत्येक हालचालीचा माग घेतला. पोलीस उपायुक्त सचिन गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने ही कामगिरी केली आहे.

हत्येनंतर साजिद शेख यांच्या कुटुंबीयांनी केवळ दोन आरोपींवर कारवाई करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला होता. मात्र, पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता, ठोस पुराव्यांवर आधारित तपास सुरू ठेवल्याने नागरिकांमध्ये पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत विश्वास वाढला आहे.

या प्रकरणात अजूनही पाच आरोपी फरार असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. लवकरच त्यांनाही अटक केली जाईल आणि संपूर्ण प्रकरणाचा छडा लावण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. जुन्या वादातून ही हत्या झाल्याचे समोर आले आहे. मृत साजिद आणि आरोपी यांच्यात वाद मिटवण्यासाठी भेट झाली होती, मात्र त्यातच वाद विकोपाला जाऊन साजिदची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0