ठाणे
Trending

Ghodbandar Road Update : घोडबंदर रस्त्यावर तीन दिवस वाहतूक बदल; अवजड वाहनांना पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन

Mira Road Ghodbandar Road Latest News : गायमूख घाट भागातील डांबरीकरणाच्या कामामुळे 8 ते 11 ऑगस्टदरम्यान वाहतुकीत बदल

मिरा रोड :- मुंबईला ठाणे आणि गुजरातशी जोडणाऱ्या घोडबंदर राज्यमार्गावरील वाहतुकीत मोठी बदल करण्यात आले आहेत. ठाणे-घोडबंदर राज्यमार्ग क्र. 84 वर गायमूख घाटभागातील डांबरीकरणाचे काम होणार असल्याने जड आणि अवजड वाहनांना 8 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून ते 11 ऑगस्टच्या पहाटे 5 वाजेपर्यंत प्रवेश बंद करण्यात आला आहे. मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाने या संदर्भात वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी केली आहे.

अशी असेल पर्यायी वाहतूक व्यवस्था

1.पालघर-विरारहून येणारी वाहने: शिरसाट फाटा येथून वळण घेऊन पारोळ, अकलोली (गणेशपुरी), अंबाडी मार्गे इच्छितस्थळी जातील.

2.पालघर-वसईहून येणारी वाहने: चिंचोटी नाक्यावरून कामन, खारबांव, अंजूरफाटा, भिवंडी मार्गे जातील.

3.मुंबईहून घोडबंदर-ठाणेकडे जाणारी वाहने: वर्सोवा ब्रिजवरून थेट गुजरात महामार्गावरून शिरसाट फाटा किंवा चिंचोटी मार्गे पर्यायी मार्ग वापरू शकतात.

4.ठाणेहून घोडबंदरकडे जाणारी वाहने: वाय जंक्शन आणि कापूरबावडी येथून नाशिक रोडने खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजूरफाटा मार्गे इच्छितस्थळी जातील.

5.अहमदाबादहून ठाणेकडे जाणारी वाहने: मनोर (टेन नाका) येथून वळण घेऊन पोशेरी, पाली, वाडा नाका, शिरीषपाडा मार्गे अंबाडी, भिवंडी येथून पुढे जातील.

ही अधिसूचना पोलीस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना लागू नसेल. फक्त हलक्या वाहनांनाच या मार्गावर ये-जा करण्याची परवानगी देण्यात आली आहे. नागरिकांनी सहकार्य करून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन पोलीस उप आयुक्त अशोक तानाजी विरकर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0