क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Mira Road News : मिरा रोड येथील “केम छो” ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांची रेड : बारबाला यांच्या साठी छुपा मार्ग

Mira Road Police Take Action On Bar : पोलिसांनी ऑर्केस्ट्रा बारमध्ये केलेल्या कारवाईत मोठा खुलासा; 11 बारबालांना अटक

मीरा रोड :– मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मीरा रोड येथील एका ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. Mira Road Police ‘केम छो’ KEM Cho Bar नावाच्या या ऑर्केस्ट्रा बारमध्ये अश्लील नृत्ये सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी अचानक छापा टाकला.Mira Road Latest Crime News

पोलिसांनी केलेल्या या कारवाईत, बारमध्ये पोलिसांच्या येण्याची सूचना देण्यासाठी चक्क अलार्म बसवण्यात आल्याचे उघड झाले आहे. तसेच, बारबालांना लपवण्यासाठी मेकअप रूमच्या मागे एक गुप्त खोली आणि तेथून पळून जाण्यासाठी लपवलेली वाट असल्याचेही समोर आले आहे.

पोलिसांनी चावीने दरवाजा उघडल्यानंतर तिथे 11 बारबाला लपलेल्या आढळल्या. पोलिसांनी बाहेरूनही नाकाबंदी केल्यामुळे त्यांना पळून जाण्यात यश आले नाही. ऑर्केस्ट्रा बारमध्ये सुरू असलेला हा छुपा प्रकार पाहून पोलीसही चकित झाले आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0