महाराष्ट्र
Trending

Rohit Pawar : ‘संविधान हटवणे हाच भाजप व मनुवादी विचारांचा खरा अजेंडा’; आमदार रोहित पवार यांचा भिडे गुरुजींवर हल्लाबोल

Rohit Pawar On Sambhaji Bhide : संभाजी भिडे यांच्या ‘भगवा ध्वज’ विधानावरून वाद पेटला; ‘तिरंगा आणि संविधानाचा आदर करायलाच हवा’

पुणे :- शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे Sambhaji Bhide यांनी लाल किल्ल्यावर भगवा ध्वज फडकवण्याच्या केलेल्या विधानावरून आता राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार Rohit Pawar यांनी या विधानावर तीव्र आक्षेप घेत भाजपवरही निशाणा साधला आहे. ‘संविधान हटवणे हाच भाजप आणि मनुवादी विचारांचा खरा अजेंडा असून, त्यासाठीच अशा वादग्रस्त व्यक्तींना पुढे केले जात आहे,’ अशी जहाल टीका रोहित पवार यांनी केली आहे.

नाशिक दौऱ्यावर असताना संभाजी भिडे यांनी म्हटले होते की, “आपण 15 ऑगस्ट रोजी तिरंगा फडकावूच, पण दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भगवा फडकवण्यासाठीही सतत काम करत राहू.” त्यांच्या या विधानाचा अर्थ तिरंग्याच्या जागी भगव्याची प्रतिष्ठापना करण्याचा असल्याचा दावा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

रोहित पवारांचा ट्विटरवरून हल्लाबोल

मंगळवारी सकाळी केलेल्या एका ट्विटमध्ये रोहित पवार म्हणाले, “संविधान हटवणे हाच भाजपचा आणि मनुवादी विचारांचा खरा अजेंडा राहिला असून, वादग्रस्त तथाकथित गुरुजींसारखी पात्रे त्यासाठीच उभी केली गेली आहेत. तिरंगा, संविधानाची मूलभूत तत्त्वे यावर जाणीवपूर्वक वादग्रस्त विधाने करून जनमताची चाचपणी केली जाते.”

पवार यांनी पुढे म्हटले की, ‘संतांनी दिलेला समता, मानवता आणि सामाजिक न्यायाचा, तसेच शिव-फुले-शाहू-आंबेडकरांचा विचार संपवण्यासाठी आणि संविधान संपवण्यासाठी छुपा अजेंडा चालवणाऱ्या अशा व्यक्तींच्या हजार पिढ्या जन्माला आल्या तरी संविधान कुणीही संपवू शकणार नाही.’ सर्वसामान्यांचे आणि महिलांचे हक्क डावलणाऱ्या मनुवादी विचारांना आपला नेहमीच विरोध राहील, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

मेघना बोर्डीकर यांचाही घेतला समाचार

रोहित पवार यांनी अन्य एका पोस्टद्वारे अधिकाऱ्याला कानशिलात हाणण्याची भाषा करणाऱ्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचाही समाचार घेतला. ते म्हणाले, आदरणीय मेघनाताई,

आपल्या कार्यक्रमाचा व्हिडीओ बघितला तर आपण मंत्री असूनही अधिकाऱ्यांकडून आपला इगो दुखावला असल्याचे स्पष्ट दिसून येते. अधिकाऱ्याला कानात मारण्याची भाषा करण्याअगोदर आपण काय बोललात तो व्हिडिओ देखील मी इथं शेअर करतोय, त्यात कार्यक्रमाला अपेक्षित गर्दी नसल्याने आणि राजकीय श्रेय मिळत नसल्याने आपला दुखावलेला इगो स्पष्ट दिसतो.

ताई, आपल्याबद्दल आदरच आहे परंतु संवैधानिक पदावर असताना असंवैधानिक कृती करणार असाल तर मात्र ते समर्थनीय नाही. भर सभेत आपल्या कुटुंबियाकडून बंदोबस्तावरील पोलिसांना अत्यंत अश्लाघ्य शिवीगाळ केल्यावर टाळ्या वाजवून दाद देणाऱ्या राज्यकर्त्यांकडून काय अपेक्षा करणार? असे रोहित पवार म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0