मुंबईमहाराष्ट्र
Trending

Kailas Gorantyal : ’50 खोके, एकदम ओके’चा नारा देणारे माजी आमदार कैलाश गोरंट्याल अखेर भाजपमध्ये

Kailas Gorantyal 50 Khoke Slogan Leader Rumored to Join BJP Jalna Politics : जालना जिल्ह्यातील शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश!

मुंबई :- राज्याच्या राजकारणात ’50 खोके, एकदम ओके’ हा नारा लोकप्रिय करणारे जालना येथील काँग्रेसचे माजी आमदार कैलाश गोरंट्याल Kailas Gorantyal यांनी गुरुवारी (31 जुलै) अखेर आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. शिवसेना फुटल्यानंतर त्यांनीच हा नारा दिला होता, जो एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांना लक्ष्य करण्यासाठी वापरला गेला. यामुळे गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशाने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

भाजपच्या प्रदेश कार्यालयात आयोजित पक्षप्रवेश कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी गोरंट्याल यांच्यासोबत अनेक माजी नगरसेवक, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यही भाजपमध्ये दाखल झाले. पक्षप्रवेशाच्या वेळी गोरंट्याल यांनी कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता, केवळ विकासाच्या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना रवींद्र चव्हाण म्हणाले, “जमिनीशी जोडलेले कार्यकर्ते असलेल्या गोरंट्याल यांचा प्रवेश आमच्यासाठी आनंदाचा विषय आहे. जालना जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी महायुती सरकारची आहे.” चव्हाण यांनी गोरंट्याल यांच्या विकासाच्या दृष्टीकोनाचे कौतुक केले.

गोरंट्याल यांनी यावेळी जालना शहरात होणाऱ्या पहिल्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपचा महापौर निवडून येईल, असा विश्वास व्यक्त केला. 1999, 2009 आणि 2019 मध्ये तीन वेळा आमदार राहिलेले गोरंट्याल 2024 च्या विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाच्या अर्जुन खोतकर यांच्याकडून 31,651 मतांनी पराभूत झाले होते. या पराभवासाठी त्यांनी पक्षातील नेत्यांवर उमेदवारी देण्यात उशीर झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता त्यांचा भाजप प्रवेश राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0