महाराष्ट्र
Trending

Manikrao Kokate : विधिमंडळातील ‘रमी’ प्रकरण भोवले! माणिकराव कोकाटेंची कृषी खातेतून उचलबांगडी, भरणेंना ‘लॉटरी’

Manikrao Kokate Latest News : कोकाटेंना क्रीडा आणि युवक कल्याण खाते, तर दत्तात्रय भरणे नवे कृषीमंत्री

मुंबई: विधिमंडळात रमी खेळताना दिसल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे Manikrao Kokate यांची अखेर कृषी खात्यातून उचलबांगडी करण्यात आली आहे. विरोधकांनी मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी लावून धरल्यानंतर सरकारवर दबाव वाढला होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंकडून कृषी खाते काढून घेत त्यांना क्रीडा आणि युवक कल्याण विभागाची जबाबदारी दिली आहे. या खातेबदलामुळे, काही दिवसांपूर्वी खातेवाटपावरून नाराज असलेले दत्तात्रय भरणे आता राज्याचे नवे कृषीमंत्री बनले आहेत.

माणिकराव कोकाटे यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे सरकारची मोठी नाचक्की झाली होती. विरोधकांनी या प्रकरणाचा निषेध करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यामुळे, सरकारवर कारवाईचा दबाव वाढत होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तात्पुरता तोडगा काढत, कोकाटेंची खुर्ची वाचवत त्यांचे खाते बदलले आहे. ही कारवाई जरी किरकोळ वाटत असली तरी, कोकाटेंना दिलेला हा एक मोठा इशारा असल्याचे मानले जात आहे.

या खातेबदलामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजकीय चाणाक्षपणा दाखवला असल्याची चर्चा आहे. एकीकडे कोकाटेंवर कारवाई करत विरोधकांचा आवाज शांत केला, तर दुसरीकडे नाराज असलेले विश्वासू दत्तात्रय भरणे यांना कृषीसारखे महत्त्वाचे खाते देऊन त्यांचे समाधान केले. भरणे यांनी खातेवाटपानंतर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती, मात्र आता त्यांना मिळालेले कृषी खाते ही त्यांच्यासाठी एक ‘लॉटरी’ ठरली आहे. त्यामुळे, अजित पवारांनी एकाच वेळी दोन उद्दिष्टे साध्य केल्याचे बोलले जात आहे.

या सर्व घडामोडींवर राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे, “श्री. दत्तात्रय गिरीजाबाई विठोबा भरणे यांना कृषी खाते देण्यात आले असून, ॲड. माणिकराव सरस्वती शिवाजी कोकाटे यांना क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ या विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.” या आदेशामुळे राजकीय वर्तुळात मोठे उलटफेर झाल्याची चर्चा सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0