क्राईम न्यूजपुणे
Trending

आयटी हब हिंजवडीत धक्कादायक घटना: 23 वर्षीय इंजिनीअरची आत्महत्या

•’मला माफ करा’ असे लिहून पियुष कवडेने संपवले आयुष्य, हिंजवडी पोलिसांकडून तपास सुरू

पुणे :- पुणे जिल्ह्यातील आयटी हब हिंजवडीमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. हिंजवडी फेज वन येथील एका नामांकित आयटी कंपनीत कार्यरत असलेल्या 23 वर्षीय पियुष अशोक कवडे या तरुण आयटी इंजिनीअरने आज सकाळी कंपनीच्या सातव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेने आयटी वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. Pune Engineer Suicide आत्महत्येपूर्वी पियुषने एक सुसाईड नोट लिहिली असून, त्यात त्याने आयुष्यात सर्वत्र अपयशी ठरल्याची खंत व्यक्त केली आहे. Pune Latest Crime News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पियुष कवडे गेल्या एक वर्षापासून ॲटलस कंपनीत आयटी इंजिनीअर म्हणून कार्यरत होता. आज सकाळी तो एका मीटिंगमध्ये सहभागी होता. मीटिंग सुरू असतानाच त्याला अचानक छातीत दुखू लागल्याचे सांगून तो बाहेर आला. त्यानंतर काही वेळातच त्याने थेट सातव्या मजल्यावरून खाली उडी मारली.

घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांना पियुषने लिहिलेली सुसाईड नोट मिळाली. या नोटमध्ये त्याने “मी आयुष्यात सगळ्या ठिकाणी अपयशी ठरलो आहे. मला माफ करा” अशा आशयाचे वाक्य लिहून आपले जीवन संपवले.

या घटनेबाबत माहिती देताना हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे म्हणाले, “सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली. पियुष अशोक कवडे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेली सुसाईड नोट आम्हाला मिळाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0