क्राईम न्यूजछत्रपती संभाजी नगर
Trending

ACB Trap News : शेततळ्यासाठी लाच मागणाऱ्या कृषी सहाय्यकाला एसीबीकडून अटक

Chatrapati Sambhaji Nagar ACB Trap News : छत्रपती संभाजीनगरमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई,5 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले, गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर: जलसंधारण योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या शेततळ्याच्या प्रस्तावासाठी 5 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या कृषी सहाय्यकाला छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. वैजापूर येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कार्यरत असलेल्या या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. Chatrapati Sambhaji Nagar ACB Trap News

मिळालेल्या माहितीनुसार, 36 वर्षीय तक्रारदाराचे नारळा शिवारात गट क्रमांक 207 मध्ये शेतजमीन आहे. या जमिनीवर जलसंधारण योजनेअंतर्गत त्यांना 2 लाख 25 हजार रुपयांचे शेततळे मंजूर झाले होते. या तळ्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात पाठवण्यासाठी कृषी सहाय्यक जगदीश गेनुदास गवळी (वय 41) यांनी तक्रारदाराकडे सुरुवातीला 30 हजार रुपयांची मागणी केली होती, जे तक्रारदाराने दिले होते. मात्र, त्यानंतरही गवळी यांनी पुन्हा पैशाची मागणी केल्याने तक्रारदाराने 22 जुलै 2025 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, छत्रपती संभाजीनगर येथे तक्रार दिली.

तक्रारीची पडताळणी 25 जुलै 2025 रोजी करण्यात आली. शासकीय पंचांसमक्ष गवळी यांनी तक्रारदाराकडे 5 हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. वैजापूर येथील हॉटेल श्रीवास्तवमध्ये, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ गवळी याने तक्रारदाराकडून 5 हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले. त्याच्याकडून vivo कंपनीचा मोबाईल आणि लाचेची रक्कम जप्त करण्यात आली आहे.सध्या आरोपीच्या घराची झडती सुरू असून, पोलीस ठाणे वैजापूर (ग्रामीण), छत्रपती संभाजीनगर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

या यशस्वी सापळा कारवाईचे मार्गदर्शन पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर यांनी केले. तसेच अतिरिक्त प्रभारी अपर पोलीस अधीक्षक तथा पोलीस उपअधीक्षक सुरेश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी धर्मराज बांगर (पोलीस निरीक्षक) आणि सापळा अधिकारी वाल्मीक कोरे (पोलीस निरीक्षक) यांनी ही कारवाई यशस्वी केली. त्यांच्यासोबत पोलीस हवालदार राजेंद्र जोशी, पोलीस अंमलदार युवराज हिवाळे, आणि सी. एन. बागुल या पथकाने कारवाई करत लाचखोर अधिकाऱ्याला अटक केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0