क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Kalyan News : कल्याणमध्ये रिसेप्शनिस्ट तरुणीला अमानुष मारहाण; आरोपीला ‘मनसे स्टाईल’चा चोप

Kalyan Latest Crime News : मारहाणीचा थरारक व्हिडीओ व्हायरल; मनसे कार्यकर्त्यांकडून आरोपीला पोलिसांच्या ताब्यात

कल्याण :- कल्याणच्या नांदिवली गावातील ‘श्री बाल चिकित्सालय’ या खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या रिसेप्शनिस्ट तरुणीवर सोमवारी सायंकाळी एका परप्रांतीय तरुणाने निर्घृण हल्ला केला. पीडित तरुणीला छाती व मानेवर लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत केस पकडून ओढण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेचा व्हिडीओ मंगळवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि खळबळ उडाली. Kalyan Latest Crime News Update

मारहाणीनंतर संबंधित आरोपी गोकुळ झा हा फरार झाला होता. पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली होतीच, पण त्याचबरोबर मनसेनेही ‘शोध मोहीम’ राबवून आरोपीला आपल्या शैलीत धडा शिकवत पोलिसांच्या ताब्यात दिले.
मनसेचे उपशहर अध्यक्ष योगेश गव्हाणे यांनी सांगितले की, “नेवाळी नाक्यावरून जाताना संशयास्पद हालचाली करणारा एक तरुण आमच्या निदर्शनास आला. विचारपूस केली असता तोच आरोपी असल्याची खात्री झाली. आम्ही त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात दिले.” गव्हाणे यांनी स्पष्ट केले की, ‘मनसे स्टाईल’ने त्याला योग्य तो धडा शिकवण्यात आला आहे.

पोलीस उपायुक्त दीपक झेंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “गोकुळ झा या मुख्य आरोपीच्या अटकेनंतर आता एकूण दोन आरोपी ताब्यात आहेत. व्हिडीओ क्लिप, प्रत्यक्षदर्शींचे जबाब हे सर्व पुरावे गोळा करून न्यायालयात सादर केले जातील. आरोपीला न्यायालयात हजर केले जाणार आहे.”

मंगळवारी माध्यमांशी संवाद साधताना पीडित तरुणीने अश्रूंमधून आपली व्यथा मांडली. “माझे आई-वडील हयात नाहीत. त्या व्यक्तीने माझ्या आईविषयी अश्लील शिवीगाळ केली. मग माझ्यावर लाथा-बुक्क्यांनी हल्ला केला. केस पकडून मला रुग्णालयाबाहेर फरफटत नेण्याचा प्रयत्न केला. हे सगळं इतकं लज्जास्पद होतं की मला स्वतःवरच राग आला,” अशा शब्दांत तिने आपली व्यथा मांडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0