मुंबई

Mira Road News : मिरारोडमधून पश्चिम बंगालच्या अपहृत अल्पवयीन मुलीची सुटका

•हरिश्चंद्रपूर (बंगाल) येथून अपहरण झालेली मुलगी ठाण्यातून शोधण्यात पोलिसांना यश

मिरारोड :- पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यातून अपहरण झालेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला मिरारोड येथून सुखरूप सुटका करण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, मिरा-भाईंदर यांना मोठे यश मिळाले आहे.
ही कारवाई मिशन मुक्ती फाउंडेशन (नवी दिल्ली) आणि रेस्क्यू फाउंडेशन (मुंबई) यांच्या सहकार्याने पार पडली.

कलकत्ता उच्च न्यायालयात प्रकरण, पोलिसांकडून समांतर तपास
सदर मुलीच्या अपहरणाबाबत दि.27 मे 2025 रोजी हरिश्चंद्रपूर पोलीस ठाणे, मालदा (प.बंगाल) येथे IPC कलम 137(2) अन्वये प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणासंदर्भात WPA(H) 46/2025 अशी याचिका कलकत्ता उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.

स्थानिक तपासातून काहीच निष्पन्न होत नसल्याने, पीडित मुलगी मिरा-भाईंदर परिसरात असल्याची गोपनीय माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली. त्यांनी तत्काळ तपास सुरू केला.

ही यशस्वी कारवाई संदीप डोईफोडे (पोलीस उप आयुक्त – गुन्हे) आणि मदन बल्लाळ (सहायक पोलीस आयुक्त – गुन्हे, मि.भा.व.वि.) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.मुख्य भूमिका बजावणारे अधिकारी पोलीस निरीक्षक देविदास हंडोरे,पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र एस. पाटील,सहाय्यक फौजदार आर. के. आसवले महिला पोलीस अंमलदार जयवंती वसावे (सर्व नेमणूक – अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, मिरा-भाईंदर) या कारवाईसाठी मिशन मुक्ती फाउंडेशन (दिल्ली) आणि रेस्क्यू फाउंडेशन (कांदिवली, मुंबई) या संस्थांनी पोलिसांना मोलाचे सहकार्य दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0