Vasai Sex Racket : “फार्महाऊसच्या आड वेश्या व्यवसायाचा अड्डा! – पोलिसांच्या सापळ्यात दलाल जेरबंद, पीडितेची सुटका”

Vasai Police Busted Sex Racket : बोगस ग्राहकाने घेतला ‘एंट्री पास’ – पोलिसांचा जबरदस्त छापा, फार्महाऊसवर चालत होती शरीर विक्रीची घाणेरडी बाजारपेठ!
वसई | वसईच्या समुद्रकिनारी मिनी गोवा फार्महाऊसच्या बाजूला वेश्या व्यवसायासाठी वापरली जात असलेली ‘समर फार्महाऊस’ ही जागा पोलिसांच्या रडारवर आली आणि मग काय – छापा टाकताच सगळा खेळ उघडकीस आला!
16 जुलै 2025 रोजी, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध शाखेच्या पोलीस निरीक्षक सौरभी पवार यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे एका बोगस ग्राहकाच्या सहाय्याने पोलिसांनी हा सापळा रचला. माहिती होतीच इतकी अचूक की, सुनिल मनोज परेड (वय 33, रा. भुईगाव) हा स्वतः ग्राहकाशी डील करून पीडित महिलेला ‘विनाशाच्या मार्गावर’ ढकलत होता.
बोगस ग्राहकाला फार्महाऊसच्या रूममध्ये बोलावलं गेलं आणि सौदा ठरताच पोलिसांनी अचानक छापा टाकला. तेव्हा सुनिल परेड वेश्याव्यवसायासाठी महिलेला पुरवण्याच्या तयारीत आढळून आला. त्याच क्षणी त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्यासोबत असलेल्या पीडित महिलेची सुटका करण्यात आली.
बोगस ग्राहकाला फार्महाऊसच्या रूममध्ये बोलावलं गेलं आणि सौदा ठरताच पोलिसांनी अचानक छापा टाकला. तेव्हा सुनिल परेड वेश्याव्यवसायासाठी महिलेला पुरवण्याच्या तयारीत आढळून आला. त्याच क्षणी त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्यासोबत असलेल्या पीडित महिलेची सुटका करण्यात आली. IPC कलम 143 (2) आणि PITA कायद्यानुसार कलम 4 व 5 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या धडाकेबाज कारवाईमुळे वेश्याव्यवसायाचा एक मोठा दुवा उघड झाला आहे.कारवाई झाली ती पोलीस उपआयुक्त संदीप डोईफोडे, सहाय्यक आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सौरभी पवार, पोलीस उपनिरीक्षक उमेश गवई, महिला पोलीस हवालदार साक्षी डोईफोडे, रोशन किणी, महेंद्र शेटये, सुप्रिया तिवले यांनी ही मोहीम यशस्वी केली.


